जाहिरात
 
 
 

बगदादमध्ये कार बॉम्बस्फोट, २८ ठार, ५० जखमी

 
Source: वृत्तसंस्था   |   Last Updated 16:47(27/01/12)
 
 
 
विज्ञापन

बगदाद - बगदादच्या नैऋत्य भागात आज सकाळी अकराच्या सुमारास झालेल्या कार बॉंबस्फोटात किमान 28 जण ठार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झाफरानियात एका दफनविधी कार्यक्रमासाठी नागरिक एकत्र आले होते. काल एका इस्टेट एजंटचा त्यांच्या पत्नी व मुलासह मृत्यू झाला होता. त्यांच्या दफनविधी लोक गोळा झाले होते. त्याच वेळी कारमध्ये बॉंबस्फोट झाला. त्यात ५० जखमी झाले आहेत. रुग्णालयाने मृतांचा आकडा जाहीर केला असला, तरी अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. नव्या वर्षांत झालेल्या विविध हल्ल्यात २०० जण ठार झाले  आहेत. हल्ल्यांमध्ये मारले गेलेल्यात शिया पंथीय समुहाचे लोक आहेत. अमेरिकेच्या लष्कराने इराकमधून नुकतीच माघार घेतली आहे. वाढती अहिंसा आणि राजकीय संकटामुळे इराक खिळखिळा झाला असून नागरी युद्ध भडकण्याची शक्‍यता आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
5 + 9

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment



Copyright © 2011-12 DB Corp ltd., All Rights Reserved.
Site Powered by I Media Corp. Ltd IMCL, DB Corp Ltd. Enterprise.