जाहिरात
Home » International » Bhaskar Gyan » Chimpagi Do Equicl Part

समान वाटे करणे हा चिंपाझींचाही स्वभाव

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 18, 2013, 08:49AM IST
समान वाटे करणे हा चिंपाझींचाही स्वभाव

समान वाटे करणे हा चिंपाझींचाही स्वभाव
नि:पक्षपातीपणा हे नेहमी मानवाचे वैशिष्ट्य मानले गेले आहे. मात्र, आता शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे की, फक्त माणसेच नाही तर चिंपांझींमध्येही हा गुण आढळून येतो. संशोधकांनी या प्रयोगात दोन ते सात वर्षांपर्यंतची 20 चिंपांझींची पिले आणि सहा प्रौढ चिंपांझींसोबत ‘फेअरनेस’ हा गेम खेळला. यावरून त्यांना आढळून आले की, माणसांवर करण्यात आलेल्या प्रयोगांच्या परिणामांशी ते मिळतेजुळते होते. अटलांटातील इमोरी विद्यापीठात येर्केस नॅशनल प्रायमेट रिसर्च सेंटरचे डॉक्टर डार्बी यांच्या मते, त्यांनी ‘अल्टिमेटम गेम’ चा उपयोग केला.माणसांमधील नि:पक्षपातीपणा किती गंभीर आहे हे या खेळावरून दिसून आले. या संशोधनातील निष्कर्ष प्रोसिडिंग्स  ऑ फ द नॅशनल अकॅडमी  ऑ फ सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.  

 खेळ सुरू करण्याआधी बक्षिसाचा निर्णय घेण्यात येतो. दोन्ही पक्ष बक्षीस वितरणावर सहमत होतात तेव्हाच खेळाला सुरुवात होते. माणूस सामान्यत: आपल्या जोडीदाराला बक्षिसातील 50 टक्के भाग देतो. चिंपांझींच्या अध्ययनातही ही बाब आढळून आली. चिंपांझी त्यांच्या हाती आलेल्या साहित्य किंवा अन्नाचे एकसारखे भाग करतात हे संशोधनाअंती दिसून आले आहे.  
discoverynews.com

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
7 + 7

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment