पाकिस्तानला 'विकत' घेण्याचा चीनचा डाव? अणूउर्जा केंद्रासाठी देणार मोठे कर्ज

इस्लामाबादः चीनकडून पाकिस्तानला 'विकत' घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. आता चीन पाकिस्तानला अणूउर्जेसाठी 136 अब्ज रुपयांचे कर्ज देणार आहे. सुमारे 340 मेगावॅट क्षमतेचे आण्विक रिऍक्टर उभारण्यासाठी या कर्जाचा वापर होणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, पंजाब प्रांतातील चश्मा भागात दोन अणूउर्जा केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण 190 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे केंद्र 2016 पर्यंत कार्यान्वित होतील. पाकिस्तान सरकारला जून 2013पर्यंत प्रकल्पाचे अर्धे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
पाकिस्तानला अशा योजनेसाठी कर्ज देऊन चीन दुहेरी डाव साधण्याच्या प्रयत्नात आहे. पाकिस्तानमध्ये स्वतःचे वर्चस्व निर्माण करणे तसेच त्याद्वारे भारतावरही दबाव वाढविणे, हे चीनचे दोन प्रमुख हेतू आहेत. चीनच्या एका कंपनीने नुकतेच एक पाकिस्तानी बंदर ताब्यात घेतले आहे. त्यामुळे भारतासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे.






