Home » International » China » Chinese Half Population Lives In Urban Area

चिनी शहरीकरण वाढले निम्मे लोक नागरी भागात

वृत्तसंस्था | Jan 19, 2013, 05:09AM IST
चिनी शहरीकरण वाढले निम्मे लोक नागरी भागात

बीजिंग - जागतिक महासत्ता होण्यासाठी धडपडणा-या चीनमधील शहरात राहणा-या लोकांची संख्या प्रचंड वाढली आहे. 2012 मध्ये शहरीकरण वाढून 50.57 टक्क्यांवर पोहोचल्याचे दिसून आले आहे.
देशातील 1 अब्ज 35 लाखांमधून निम्मी लोकसंख्या नागरी भागात राहते, असे पाहणीतून स्पष्ट झाले आहे. नॅशनल ब्युरो आॅफ स्टॅटिक्सच्या वतीने (एनबीएस) शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या अहवालात शहरीकरणाचा फुगवटा दिसून आला आहे. गेल्या वर्षी चीनची लोकसंख्या 60 लाख 69 हजारांनी वाढली होती. 2011 च्या तुलनेत ती अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकसंख्येतील अतिरिक्त पॉइंट म्हणजे 10 लाख लोकसंख्येचे शहरातील विलीनीकरण होय, असे चीनच्या इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स एक्स्चेंजचे उपाध्यक्ष झेंग शिनली यांनी म्हटले आहे. देशात काही वर्षांत 221 मेगासिटी तयार होतील. त्यातील किमान दहा शहरांची लोकसंख्या 1 कोटीपेक्षाही अधिक असेल. 2025 पर्यंत शहरी लोकसंख्या 1 अब्जापर्यंत जाईल, असे भाकीतही अहवालातून व्यक्त करण्यात आले आहे.

Email Print
0
Comment