जाहिरात
Home >> International >> Pakistan >> Dilip Kumar Old Home In Pakistan

दिलीपकुमार यांच्या ‘पुश्तैनी’ घराची ट्रॅजिडी!

वृत्तसंस्था | Jul 04, 2012, 06:39AM IST
 
 


इस्लामाबाद - ज्येष्ठ अभिनेते ‘ट्रॅजिडीकिंग’ दिलीपकुमार यांच्या पाकिस्तानातील वडिलोपाजिर्त घराचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याचे काम तूर्त लांबणीवर पडले आहे. या घरावर अनेकांनी ताबा सांगितल्याने प्रशासन पेचात पडले आहे. दिलीपकुमार यांचे हे घर पेशावरमध्ये आहे. या घराचे राष्ट्रीय स्मारक करून त्याचे जतन करण्याची पाकिस्तानी सरकारची योजना आहे.



खैबर-पख्तुनख्वा प्रांताच्या सरकारने ही योजना आखली परंतु अनेकांनी त्यावर आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे सरकारने अखेर पाहा व प्रतीक्षा करण्याचे धोरण अवलंबिले आहे. राष्ट्रीय स्मारकाची योजना अद्याप आम्ही रद्द केलेली नाही, परंतु आम्ही आता आमचा प्राधान्यक्रमाचे मूल्यमापन करत आहोत, असे सरकारी अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले.



या घराचा मालकी हक्क एकापेक्षा अधिक जणांनी सांगितल्यामुळे हे घर खरेदी करायचे नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. प्रांताचे सांस्कृतिक संचालक परवेझ खान यांच्या हवाल्याने डॉन वृत्तपत्राने म्हटले आहे. आता काही कायदेशीर बाबींचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच सध्या तरी घराचा खरा मालक कोण, ही गोष्ट स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे संचालनालयाने ही योजना थांबवली आहे.



माझ्याकडे ही मालमत्ता विकत घेतल्याची कागदपत्रे आहेत. मीच या घराचा कायदेशीर मालक आहे, असे सध्या घराचा ताबा असलेल्या इक्रमुल्लाह खान यांनी म्हटले आहे. सरकारने या घरासाठी 3 कोटी रुपये देऊ केले होते. त्यानंतर अनेकांनी आपणच या घराचे मालक असल्याचा दावा करण्यास सुरुवात केली. प्रदेश सरकारने या घराच्या विक्रीसाठी दिलीप कुमार यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला आहे. त्यासाठी त्यांच्याकडे विक्रीची परवानगी मागण्यात आली. दुसरीकडे या घराची विक्री दिलीप कुमार यांच्या नातेवाइकांना कल्पना न देता त्यांच्या जुन्या नोकराने केल्याचा संशय ‘डॉन’ या वृत्तातून व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये खैबर-पख्तुनख्वाचे माहिती मंत्री मियान इफ्तिखार हुसैन यांनी राष्ट्रीय उद्यान करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर राज कपूर, शाहरूख खान यांच्या वंश परंपरागत घरांचेही राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याचा प्रस्तावही नंतर मांडण्यात आला होता. दिलीपकुमार यांचा जन्म पेशावरमध्ये 11 डिसेंबर 1922 मध्ये झाला. त्यांचे वडील लाला गुलाम सरवर हे र्शीमंत फळ विक्रेते होते. दिलीपकुमार यांनी लहानपणीची अनेक वर्षे पेशावरमध्ये घातली. त्यांचे हे घर किसा ख्वानी बाजारजवळ आहे.



होजियरीचा गोदाम

दिलीपकुमार यांच्या या घराचा ताबा सध्या इक्रमुल्लाह खान यांच्याकडे आहे. त्यांनी ही इमारत गोदाम म्हणून वापरण्यास सुरुवात केली आहे. या घराच्या शेजारी असलेल्या होजियरी दुकानाचा माल या ठिकाणी ठेवण्यात येतो. हे घर आपण सहा वर्षांपूर्वी पाच लाख रुपयांना विकत घेतले होते, असे खान यांचे म्हणणे आहे.

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
8 + 6

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment