जाहिरात
 
 
 

डॉल्फिन व व्हेललाही हवेत माणसासारखेच हक्क

 
Source: वृत्तसंस्था   |   Last Updated 23:23(22/02/12)
 
 
 

ओटावा - डॉल्फिन आणि व्हेल माशांनाही माणसांप्रमाणेच जगण्याचा हक्क आणि सन्मान मिळायला हवा, अशी मागणी कॅनडातील शास्त्रज्ञाच्या बैठकीत करण्यात आली आहे. वन्यजीव व्यवहाराचे अभ्यासक याबाबत एका जाहीरनाम्याचीही मागणी करू लागले आहेत. डॉल्फिन आणि व्हेल माशामध्ये प्रचंड बुद्धिमत्ता असल्यामुळे त्यांच्याबाबतीत माणसांसारखाच विचार करण्यात आला पाहिजे, असे या शास्त्रज्ञांना वाटते. या माशांना माणसांसारखे अधिकार मिळाल्यानंतर मनोरंजनासाठी त्यांचा उपयोग करण्यावर निर्बंध येणार आहेत. भावना आणि संवेदना केवळ माणसांमध्येच नसतात, हे विज्ञानाने दाखवून दिले आहे. डॉल्फिन आणि व्हेल माशांनाही माणसांप्रमाणेच संवेदना असतात, असे या शास्त्रज्ञांचे मत आहे. प्रशिक्षित करण्यात आलेल्या डॉल्फिन आणि व्हेल माशांनी अनेक वैज्ञानिक संशोधनांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. या माशांची तस्करी आणि शोषण रोखणे हा ही मागणी करण्यामागचा मुख्य हेतू असल्याचे कॅनडातील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
4 + 4

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment