Home » International » Other Country » Facebook Target Of Cyber Attack

फेसबुकवर सायबर हल्ला

वृत्तसंस्था | Feb 16, 2013, 23:23PM IST
फेसबुकवर सायबर हल्ला

सॅनफ्रान्सिस्को- गेल्या महिन्यात आपल्या संगणक प्रणालीवर सायबर हल्ला झाला होता; परंतु त्याविषयीचे पुरावे नसल्याचे फेसबुककडून शनिवारी जाहीर करण्यात आले. एका ब्लॉग पोस्टवरून कंपनीवर हा हल्ला झाला होता. सायबर हल्ल्याची शिकार झालेल्या एका संकेतस्थळावरून फेसबुकला लक्ष्य करण्यात आले होते. ज्या यंत्रांना याचा फटका बसला आहे त्यांच्या काम शनिवारपर्यंत सुरूच होते. त्याचबरोबर देशाच्या संरक्षण संचालनालयाला माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या सातत्याने संपर्कात असल्याचे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. हल्ल्यात जगभरातील 2 लाख 50 हजार यूजर्सच्या अकाउंटवरील माहिती चोरीला गेली आहे. त्याविषयी अमेरिकेने जागतिक व्यापार संघटनेकडे तक्रार केली आहे.

जावाचे सॉफ्टवेअर
सायबर हल्ला प्रकरणात हल्लेखोरांनी जावाचे सॉफ्टवेअर वापरले. ओरॅकल कंपनीने तयार केलेल्या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला. केवळ फेसबुकच नव्हे तर इतर सोशल नेटवर्किंग साइटलाही त्याचा फटका बसला आहे, असे फेसबुककडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Email Print
0
Comment