Home » International » Other Country » Google Launch Its First Cromobook Pixal Tuch Screen Laptop

गुगलचा पहिला क्रोमबुक पिक्सल टचस्क्रिन लॅपटॉप बाजारात दाखल

वृत्तसंस्था | Feb 23, 2013, 06:08AM IST
गुगलचा पहिला क्रोमबुक पिक्सल टचस्क्रिन लॅपटॉप बाजारात दाखल

सॅन फ्रान्सिस्को - जगातील सर्वात मोठी इंटरनेट कंपनी गुगलने आपला पहिलावहिला क्रोमबुक पिक्सल टचस्क्रीन लॅपटॉप लाँच केला. क्रोम ऑपरेटिंग सिस्टिमवर तो चालतो. कंपनीचे सीनियर व्हाइस प्रेसिडेंट सुंदर पिचाई यांनी सांगितले की, या लॅपटॉपमध्ये 1.8 गीगाहर्ट्झ इंटेल कोअर आय -5 ड्युअल कोअर प्रोसेसर आहे. त्यामुळे याची गती वाढते. अमेरिका, ब्रिटननंतर इतर देशांत हा लॅपटॉप उपलब्ध होईल. याच्या 32 जीबी वायफाय व्हर्जनची 70 हजार तर 64 जीबी एलटीई व्हर्जनची किंमत 80 हजार रुपये आहे.

वैशिष्ट्ये : 1.8 गीगाहर्ट्झ इंटेल कोअर आय-5 ड्युअल कोअर प्रोसेसर
* डिस्प्ले स्क्रीन 13 इंची
* स्क्रीन पिक्सल 239 प्रतिइंच (अ‍ॅपलच्या मॅकबुकप्रोपेक्षा 12 पिक्सल प्रतिइंचाने जास्त)
* 4 जीबी रॅम
* एचडी ग्राफिक कार्ड
* 2 यूएसबी पोर्ट्स
* टू इन वन कार्ड रीडर
* 3.0 ब्लूटूथ आणि वायफाय

Email Print
0
Comment