माकडाच्या मेंदूचा उलगडा!

वॉशिंग्टन - माकडाच्या मेंदूच्या कार्यप्रणालीचा उलगडा झाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. दोन माकडे एखादे काम करण्यासाठी सरसावण्याआधी त्यांच्या मेंदूतील कार्यपद्धतीचा अंदाज बांधला जाऊ शकतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
एखादे उद्दिष्ट गाठताना वाटेत अडथळा आल्यानंतर माकडांचा समूह कशा पद्धतीने त्यातून मार्ग काढतो, याचा अभ्यास वॉशिंग्टन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केला आहे. शास्त्रज्ञ गेल्या 30 वर्षांपासून याचा अभ्यास करत आहेत. मेंदूतील मोठ्या प्रमाणातील न्यूरॉन्सचे डिकोडिंग करून माहिती मिळवली जाऊ शकते, असे संशोधन करण्यात आले आहे. सायन्स जनरलच्या ऑनलाइन आवृत्तीमध्ये याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगात गोळीबारादरम्यान माकडाच्या एका न्यूरॉनमध्ये झालेला बदल टिपला आहे.एका न्यूरॉन्सच्या साहाय्याने अनेक कामे होऊ शकतात. त्याप्रमाणे एखादे काम हाताने करायचे असेल त्याच वेळी ठरावीक न्यूरॉन्स सक्रिय होतात, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
माकडांच्या संख्येनुसार रणनीती समजल्याने त्यांचे मन जाणल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. विशेष म्हणजे ज्या दोन माकडांवर संशोधन करण्यात आले त्यांच्यात साम्य नाही. एक माकड बंदुकीवर जवळपास उड्या मारत होते, तर कोणतेही पाऊल उचलण्याआधी शांतपणे सगळ्या गोष्टी पाहत होते. दोघांतील फरक त्यांच्या मेंदूतील वेगवेगळ्या रचनेवरून स्पष्टपणे जाणवल्याचे वॉशिंग्टन विद्यापीठाच्या सेंट लुइस येथील स्कूल ऑफ मेडिकलचे संशोधक डॅनियल मॉरन यांनी सांगितले.





