जाहिरात
 
 
 

युरोपात येत आहे हिमयुग

 
Source: डीबी स्टार . नेटवर्क   |   Last Updated 08:17(13/02/12)
 
 
 

हिमवृष्टीमुळे लंडनच्या हिथ्रो विमानतळावरून 1200 उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीच्या दृष्टीने हिथ्रो हे जगातील सर्वात व्यग्र विमानतळ आहे. या विमानतळावर दररोज 1 लाख 80 हजार प्रवासी येतात. अ‍ॅमस्टरडम व रोमहून लंडनला येणारी विमानेही रद्द करण्यात आली आहेत.

हिथ्रोचे मुख्य परिचलन अधिकारी नॉर्मंड बोईविन म्हणाले की, विमाने रद्द केल्यामुळे 70 टक्के प्रवाशांची गैरसोय झाली. लवकरच विमानतळाचे कामकाज सुरळीत होईल, असा विश्वास बोईविन यांनी व्यक्त केला. तिकडे स्कॉटलँड व वेल्सच्या काही भागांत प्रचंड हिमवृष्टी झाल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. लंडनच्या रस्त्यांवर जवळपास 10 हजार टनांहून अधिक बर्फ गोळा झाला आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रस्त्यावरील बर्फ हटवण्यासाठी स्टॅनस्टेड विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहे. 

अल निनोचा परिणाम

युरोपात दोन वर्षांपासून कडाक्याची थंडी पडत आहे. यंदा हिमवर्षाव अधिक झाला आहे. हा अल निनोचा प्रभाव असल्याचे मानले जात आहे. जेव्हा जेट स्ट्रीमच्या मार्गात बदल   होतो आणि उत्तर अटलांटिक महासागराच्या भूपृष्ठावर वातावरणीय दबाव वाढतो तेव्हा युरोपात वाहणाºया उष्ण हवेत घट होते. परिणामी अल निनो निर्माण होते. अल निनोमुळे जगाच्या वेगवेगळ्या भागांत महापूर, दुष्काळ व हिमवृष्टी असे व्यापक वातावरणीय बदल दिसून येतात. त्यास वैश्विक वातावरणात परिवर्तनाशी जोडले जाते.

250 पेक्षा अधिक मृत्यू

युरोपच्या अनेक भागांत तापमान शून्य ते 30 अंश सेल्सियस खाली घसरले आहे. हिमवृष्टीमुळे विशेषत: पूर्व युरोपातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमवृष्टीमुळे लंडनमध्ये 10 सें.मी. जाडीचा बर्फाचा थर जमा झाला आहे. युरोपात थंडीमुळे 250 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. युके्रनच्या मिनिस्ट्री आॅफ इमर्जन्सीच्या अहवालानुसार, थंडीमुळे तेथे आतापर्यंत 131 लोकांचा बळी गेला असून शेकडो लोकांना हायपोथर्मियामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. थंडीमुळे पोलंडमध्ये 53 पेक्षा जास्त, इटलीमध्ये 11 पेक्षा जास्त आणि फ्रान्समध्ये 5 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. 

कार्बन उत्सर्जनात हवी घट

‘नेचर’ नियतकालिकात 2004 मध्ये प्रकाशित एका लेखानुसार, वातावरणात कार्बन डायआॅक्साइडच्या वाढत्या उत्सर्जनामुळे पश्चिम युरोपात वेगाने थंडी वाढू शकते. युनिव्हर्सिटी आॅफ बर्नचे संशोधक थॉमस स्टॉकर व आंद्रेस सॅचमिथनर यांनी या विषयावर अभ्यास केला होता. त्यांनी सरळ वातावरणीय मॉडेलच्या माध्यमातून दाखवून दिले होते की, मानवी कारणांमुळेच बेधडक होणाºया कार्बन डायआॅक्साइडच्या उत्सर्जनामुळे थर्मोहेलाइन सर्क्युलेशन (कोट्यवधी मेगावॅट उष्मा मेक्सिकोच्या खाडीकडून उत्तर अटलांटिक व युरोपाकडे जाणे) बाधित होऊ शकते. त्यामुळे युरोपात आइस एजचा धोका वाढू लागला आहे.

ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम!

1970-80 च्या दशकातही शास्त्रज्ञांमध्ये या गोष्टीवर खूप चर्चा होत असे की, कडाक्याची थंडी हिमयुगाची नांदी आहे. या काळात ग्लोबल वॉर्मिंगने चर्चेची दिशा बदलून टाकली. ग्लोबल वॉर्मिंगमध्ये कमीत कमी हिमयुग तरी येणार नाही, अशी अपेक्षा लोक करू लागले होते. मात्र, या काळात एका तथ्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे की, आपण इंटरग्लेशियर पिरियडमध्ये जगत आहोत आणि पृथ्वीच्या धु्रवांवर बर्फ मोठ्या प्रमाणावर तसाच जमा आहे. हवामानात होणाºया बदलामुळे हिमयुग परतू शकते. पुराव्यांवरून एवढे तरी सिद्ध झाले की, किमान पश्चिम युरोप व यूकेमध्ये ते येण्याचा धोका अधिक आहे आणि ते लवकरच येईल. समस्या ओशिएनिक करंटची आहे, तिला गल्फ स्ट्रीमही म्हणतात. गल्फ स्ट्रीमशिवाय यूके व ईशान्य युरोपात तापमान पाच अंश सेल्सियस घसरेल. अशा वेळी 17 व्या व 19 व्या शतकातील लिटिल आइस एज पुन्हा पाहायला मिळू शकते.

आतापर्यंत पाच हिमयुगे

शास्त्रज्ञांच्या मते, आतापर्यंत पाच हिमयुगे येऊन गेली आहेत. त्यात सर्वात पहिले हिमयुग हुरोनिएन होते. हे सर्वात प्राचीन ज्ञात हिमयुग होते आणि जवळपास 2.4 ते 2.1 अब्ज वर्षांपूर्वी ते अस्तित्वात होते. त्यात भयंकर थंडी पडली होती आणि हे हिमयुग दीर्घकाळ राहिले होते. त्यानंतर क्रायोजेनियन हिमयुग आजच्या 85 कोटी वर्षांपूर्वी आले होते. त्यास गेल्या एक अब्ज वर्षांतील सर्वात भयंकर हिमयुग मानले जाते. त्यात संपूर्ण पृथ्वी बर्फाने झाकली गेली होती. त्या काळात अंतराळातून पृथ्वी केवळ एक पांढºयाशुभ्र बर्फाचा गोळा दिसत होती, असे म्हटले जाते. त्यानंतर ऐंडियन-सहारन हिमयुग आले, जे आजच्या 46 ते 43 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. हे छोटेसे हिमयुग होते. त्यानंतर कारू हिमयुग आजच्या जवळपास 36 ते 26 कोटी वर्षांपूर्वी आले होते. त्या काळी पृथ्वीवर वनस्पती आणि मोठी झाडे असलेले घनदाट जंगल होते. पृथ्वीच्या वातावरणात कार्बन डायआॅक्साइड कमी आणि आॅक्सिजनचे प्रमाण खूप जास्त झाले होते. परिणामी पृथ्वीच्या तापमानात कमालीची घसरण  झाली आणि हिमयुग सुरू झाले. सध्याचे हिमयुग क्वॉटनरी हिमयुग आहे. ते जवळपास 25 लाख वर्षांपूर्वी सुरू झाले होते.

बोस्नियात घेत आहेत हेलिकॉप्टरची मदत

सहा फूट बर्फाखाली दबलेल्या गावांमध्ये मदतकार्य करण्यासाठी बोस्निया सरकार हेलिकॉप्टरची मदत घेत आहे. तेथे जवळपास 100 हून अधिक दुर्गम गावांमध्ये 10 हजारांपेक्षा अधिक लोक अडकले आहेत. राजधानी साराजेव्होमध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. तेथे शुक्रवारपासूनच रस्त्यांवर एक मीटरहून अधिक उंचीचा बर्फाचा थर जमा झाला आहे. हिमस्खलनामुळे 20 तासांपेक्षा अधिक काळ कारमध्ये अडकलेल्या डझनावर लोकांना बचावकार्य करणाºया जवानांनी बाहेर काढले. शेजारच्या सर्बियामध्येही अशीच परिस्थिती आहे. येथे 70 हजारांहून अधिक लोकांचा उर्वरित जगापासून संपर्क तुटला आहे. बल्गेरिया या युरोपियन युनियनच्या सर्वात गरीब देशात परिस्थिती चिंताजनक आहे.



हिमयुगाबाबत सिद्धांत

हिमयुगाबाबत अनेक प्रकारचे सिद्धांत सांगण्यात येतात. त्यापैकी एक आहे अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल थेअरी. त्यात सौर उत्सर्जनात परिवर्तन, अंतराळातील थंड क्षेत्रातून पृथ्वी फिरणे, अंतराळातून थेट पृथ्वीवर बर्फ कोसळणे हे मुद्दे सांगितले जातात. 19 व्या शतकातील स्कॉटिश शास्त्रज्ञ जेम्स क्रॉल यांनी सांगितले होते की, पृथ्वीच्या कक्षेच्या अस्थिर वर्तनामुळे आइस एज येते, तर खंडीय विस्थापन सिद्धांतात म्हटले आहे की, खंडांचे ऊर्ध्वाधर आणि क्षैतिज दिशेने विस्थापन होते. त्यामुळे सागरी प्रवाहाच्या दिशेत बदल होतो. परिणामी जल व जमिनीतही परिवर्तन होते. पृथ्वी ज्या अक्षात फिरते   त्या अक्षाच्या बदलास हिमयुगाशी जोडले गेले होते. 1922 मध्ये ए. वेगेनर यांनी खंडीय कलाचा सिद्धांत मांडला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, खंड घसरल्यामुळे पृथ्वीचे वातावरण थंड होते आणि पृथ्वीवर बर्फाचा थर गोळा होतो. युनिव्हर्सिटी आॅफ टोरँटोचे कोलमन यांच्या मते, खंडांचा कल बदलणे हे हिमयुग येण्याचे नैसर्गिक कारण आहे. याशिवाय प्लेट टेक्टोनिक्स, वातावरण वा सागरी बदल, पर्वतांची निर्मिती, हरितगृह वायूंच्या परिणामाचा संबंधही हिमयुगाच्या आगमनाशी जोडला जातो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
4 + 3

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment