जाहिरात
 
 
 

भारत-अमेरिकेची संगणक क्षेत्रात भरारी

 
Source: वृत्तसंस्था   |   Last Updated 23:26(22/02/12)
 
 
 
विज्ञापन

वॉशिंग्टन - भारतीय अमेरिकी अभियंत्याने भौतिकशास्त्रामध्ये मोठे यश संपादन केले असून ज्याच्या आधारे संगणकाला लागणा-या विजेची बचत होणार आहे. या संशोधनामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आमूलाग्र बदल होईल, असा दावा करण्यात आला आहे.

या संशोधनामध्ये प्रकाशाच्या स्रोतासाठी जरमॅनियमचा उपयोग लेजर म्हणून करण्यात आला आहे.फोटोनिक क्लिप्सच्या ऐवजी लाइट पार्टिकल्स किंवा फोटॉन्सचा म्हणजे फोटोनिक क्लिप्सचा वापर करण्यात आला आहे. डॉ. बीरेंद्र राज (दत्त) यांनी स्वत:च्या एपिक कॉर्पोरेशनमध्ये यावर संशोधन केले आहे. मॅसॅच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि स्टँडफोर्ड विद्यापीठामध्ये या कॉम्प्युटर चिप्सचा सुरुवातीस उपयोग करण्यात येणार आहे. आयआयटी खरगपूरमधील अभियंते असलेले दत्त हे एपिक कॉर्पोरेशनचे सीईओ आहेत. सद्य:स्थितीपर्यंत अशक्यप्राय वाटणारी जरमॅनियम लेजर बनवण्यात एपिकला यश आले आहे. या संशोधनातील निष्कर्ष किट्टी हॉक प्रदर्शनामध्ये दाखविण्यात आले, ज्यात या यशावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे अमेरिकी संरक्षण संशोधन संस्थेचे माजी संचालक टोनी टेथर यांनी सांगितले. संगणकाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होण्याबरोबरच संगणकाची वीज बचत होण्याला मदत मिळणार आहे. या संशोधनामुळे जगभरात व्यापक स्वरूपात ऑनलाइन सेवा देण्यास मदत मिळेल, विशेषकरून दुर्गम भागातील लोकांना त्याचा उपयोग होईल, असे दत्त म्हणाले. विजेचा जादा वापर होणा-या इलेक्ट्रॉनिक प्रोसेसरच्या मागणीची गरज या निमित्ताने भागविली जाईल.

ऑनलाइन सेवा देण्यास मदत - या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एपिक तसेच न्यूयॉर्क येथील नॅनोस्केल विज्ञान आणि तंत्रज्ञान महाविद्यालय दोन वर्षांमध्ये फोटोनिक चिप्स तयार करणार आहे. शास्त्रज्ञ आणि उद्योग जगत या संशोधनाची वाट पाहत होते. या यशाबद्दल माझ्या पथकाचा मला अभिमान वाटत असल्याचे दत्त यांनी सांगितले. इलेक्ट्रॉन्स सिलिकॉन कॉम्प्युटर चिप्समध्ये ज्याप्रमाणे वापरले जाते तसाच उपयोग फोटॉनचा करण्यासाठी मी उत्सुक आहे, असे त्यांनी सांगितले.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
10 + 6

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment