जाहिरात
 
 
 

अमेरिकेच्या विरोधात अफगाणमध्ये निदर्शने

 
Source: वृत्तसंस्था   |   Last Updated 23:24(22/02/12)
 
 
 
विज्ञापन

काबूल - नाटो सैनिकांनी पवित्र कुराण जाळल्याप्रकरणी अमेरिकेने माफी मागितल्यानंतरही या घटनेच्या निषेधार्थ अफगाणिस्तानात हजारो लोक रस्त्यावर येऊन निदर्शने करीत आहेत. या निदर्शकांना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या गोळीबारात 10 जण जखमी झाले आहेत. बुधवारी जलालाबादमध्येही जोरदार निदर्शने करण्यात आली.

अफगाणिस्तानातील अमेरिकी कमांडर जनरल जॉन अ‍ॅलन यांनी कुराणच्या प्रती जाळल्याप्रकरणी जाहीर माफी मागितली. अमेरिकेच्या लष्करी तळावर ‘चुकून’ कुराणच्या प्रती जाळण्यात आल्या. ही गंभीर चूक असल्याचे त्यांनी कबूल केले. तालिबान अतिरेकी एकमेकांना संदेश पाठवण्यासाठी कुराणचा वापर करीत असल्याच्या संशयावरून अमेरिकी सैनिकांनी कुराणच्या प्रती जाळल्या होत्या. स्थानिक कामगारांना जळालेल्या कुराणाच्या प्रती मिळाल्यानंतर हा वाद चिघळत गेला आहे.

या घटनेमुळे संतप्त होऊन हजारो लोक रस्त्यावर उतरले. ‘अमेरिकेचा मृत्यू’ अशा घोषणा देत त्यांनी जोरदार नारेबाजी केली. शहरातील अमेरिकेच्या ठिकाणांवर दगडफेक करण्यात आली. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. त्यात 10 निदर्शक आणि दगडफेकीत किमान चार पोलिस जखमी

झाले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
10 + 9

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment