जाहिरात
Home » International » Other Country » Libyans' New Love Affair With Ice Cream

लिबियात आइस्क्रीमचे पेव!

वृत्तसंस्था | Jan 07, 2013, 02:00AM IST
लिबियात आइस्क्रीमचे पेव!

त्रिपोली - शीर्षक वाचून आश्चर्य वाटेल, परंतु हुकूमशहा कर्नल मुअम्मर गद्दाफी यांच्या मृत्यूनंतर लिबियात सर्वाधिक वाढलेली एखादी गोष्ट म्हणजे आइस्क्रीम पार्लर !  

गद्दाफींची सत्ता असताना राजधानीत आइस्क्रीम पार्लरची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती. गद्दाफी सत्तेचा पाडाव झाल्यानंतर मात्र आइस्क्रीमची मागणी वाढली आणि पार्लरच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. लोक आता आइस्क्रीमचा चांगलाच स्वाद घेऊ लागले आहेत. आता राजधानीत आइस्क्रीमची मोठी बाजारपेठ आहे. त्यावर नागरिकांना अभिमान वाटतो. पूर्वी असे चित्र नव्हते, असे एका पार्लरचे मालक हुसेन बानोर यांनी सांगितले. काही पार्लरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 36 आइस्क्रीम मिळतात. त्याला लोक चांगली पसंती देतात. देशातील क्रांतीनंतर लोकांना बदल हवा आहे. त्यासाठी बाजारपेठेचा चेहरा बदलू लागला आहे. लिबियातील लोकांचे खाण्यावर प्रेम आहे. खाण्याच्या आवडीमुळेच आम्ही यशस्वी असल्याचे येथील व्यावसायिकांनी मान्य केले आहे.  

थंडीतही पार्लर  - त्रिपोलीमध्ये जिलातिलतालिया नावाचे आइस्क्रीम पार्लर काही दिवसांपूर्वीच सुरू झाले आहे. सध्या थंडीचा मोसम असूनही पार्लरची मालकीण रुवेदा अल-रायेस यांनी दुसरे पार्लर सुरू केले आहे. थंडीचा कडाका असतानाही त्यांना आणखी एक पार्लर सुरू करताना त्यांना ते चालेल किंवा नाही, याची थोडीही भीती वाटली नाही. त्यांचे दुकान सुरू होताच काही वेळात बाहेर आबालवृद्ध नागरिकांनी आइस्क्रीमचा स्वाद घेण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले.

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
7 + 4

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment