जाहिरात
 
 
 

मारुती अशी बनली ‘करोडपती’

 
Source: डीबी स्टार . नेटवर्क   |   Last Updated 07:45(20/02/12)
 
 
 

मारुती उद्योग लिमिटेडची स्थापना फेब्रुवारी 1981 मध्ये करण्यात आली होती. देशात मोठ्या प्रमाणावर कारचे उत्पादन व विक्री करणारी ही पहिली कंपनी होती. कंपनीने डिसेंबर 1983 मध्ये गुडगाव येथील प्रकल्पातून पहिली कार सादर केली. हळूहळू कंपनीने देशांतर्गत कार बाजारात क्रांती घडवून आणली आणि आज मारुतीचा बाजारात हिस्सा जवळपास 50 टक्के आहे. 

मारुतीसोबत संयुक्त उद्योगासाठी छोट्या कारमध्ये प्रवीण असलेल्या जपानच्या सुझुकी कंपनीची निवड करण्यात आली होती. 17 डिसेंबर 2007 मध्ये मारुती उद्योग लिमिटेडचे नाव बदलून मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड करण्यात आले. कंपनीच्या गुडगाव प्रकल्पात तीन पूर्ण एकीकृत उत्पादन विभाग आहेत. याशिवाय मारुतीने आपला चौथा कार असेम्ब्ली प्लांट मानेसरमध्ये सुरू केला आहे. मारुतीची अल्टो ही देशात सध्या सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. कंपनीच्या इतर मॉडेलमध्ये मारुती 800, एस्टीम, स्विफ्ट, वर्सा, वॅगन आर, एसएक्स 4 सेडान व झेन एस्टिलो समाविष्ट आहेत. काही दिवसांपूर्वीच मारुतीने हॅचबॅक ‘रिट्झ’ बाजारात आणली आहे.

तीन दशकांपासून आघाडीवर सुझुकी मोटर कार्पोरेशन

जपानची सुझुकी मोटर कार्पोरेशन मारुतीची सहयोगी कंपनी आहे. मारुतीमध्ये सुझुकीची 54.2 टक्के भागीदारी आहे. सुझुकी मोटर कार्पोरेशन गेल्या तीन दशकांपासून छोट्या कारमध्ये ‘ग्लोबल लीडर’ बनलेली आहे. सुझुकीचे तांत्रिक श्रेष्ठत्व तिच्या कॉम्पॅक्ट व वजनाने हलक्या इंजिनमध्ये आहे, जे शक्ती व कार्यक्षमतेत सर्वोत्तम आहे.

हलके इंजिन कमी इंधनात अधिक मायलेज देऊन चांगले प्रदर्शन करतात. जे. डी. पॉवर आशिया पॅसिफिक या संस्थेने ‘1999 ते 2009 या काळात ग्राहकांचे समाधान’ या मुद्द्यावर देशात सर्व कार निर्मात्यांचे एक सर्वेक्षण केले. त्यात मारुती सुझुकीला पहिला क्रमांक दिला आहे. मारुती सुझुकी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज व नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टेड आहे.

आर. सी. भार्गवांमुळे यश

मारुती सुझुकीच्या या यशात मारुती उद्योग लिमिटेडचे चेअरमन आर. सी. भार्गव यांचा सिंहाचा वाटा आहे. ते 1981 मध्ये संचालक (विपणन) म्हणून कंपनीत रुजू झाले होते. 1984 मध्ये ते कंपनीचे सहसंचालक, 1985 मध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि 1990 मध्ये अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बनले. त्यानंतर 1998 मध्ये कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि 2003 मध्ये मारुती उद्योग लिमिटेडचे संचालक.

2007 मध्ये मारुती उद्योग लिमिटेडचे नाव बदलून मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड झाले आणि भार्गव तिचे चेअरमन बनले. भार्गव यांनी पत्रकार सीता यांच्यासह मारुती की कहाणी ‘द मारुती स्टोरी’ लिहिली. त्यात यशाचे मंत्र सांगितले आहेत. अर्थमंत्री प्रणव मुखर्जींनी मार्च 2010 मध्ये या पुस्तकाचे विमोचन केले होते.

यामुळे बनली मारुती नंबर वन

मारुती कारला नंबर वन कार बनवण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत. कंपनीने देशाच्या गरजेनुसार स्वस्त, दणकट आणि जवळपास मेंटेनन्स फ्री कार बाजारात आणली. सर्व्हिस स्टेशन, डीलरशिपचे उत्तम जाळे विणले आणि सेकंडहँड कार बाजारासाठी ट्रू व्हॅल्यू आउटलेट उघडले.

>    लोकांची गरज पूर्ण केली मारुती 800 ने - 1983 मध्ये लाँच झाल्यानंतर 2004 पर्यंत मारुती 800 देशातील सर्वाधिक विकली जाणारी छोटी कार होती. जगभरात 10 लाख मारुती 800 कार विकल्या गेल्या. सद्य:स्थितीत विक्रीच्या चार्टमध्ये मारुती सुझुकी अल्टो आघाडीवर आहे. रस्ते अपघात कमी करणे आणि लोकांना योग्य ड्रायव्हिंग शिकवण्याच्या कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत दिल्लीत कंपनीने मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कूल उघडले. हे स्कूल आंतरराष्ट्रीय मानकांच्या आधारावर उघडण्यात आले होते. तेथे कार शिकणाºयास प्रॅक्टिकल सेशनशिवाय क्लासरूममध्येही शिकवले जाते. कार चालवण्यापूर्वी शिकणाºयास सिमुुलेटर्सवर प्रशिक्षण दिले जाते.

>    मोठ्या नेटवर्कचा झाला फायदा - मार्च 2011 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, कंपनीचे देशात 933 डीलर्स व 2,946 सर्व्हिस स्टेशन्स (त्यात डीलर वर्कशॉप व मारुती अधिकृत सर्व्हिस स्टेशन्सचा समावेश आहे) आणि 30 एक्स्प्रेस सर्व्हिस स्टेशन्स आहेत. कंपनीला सर्व्हिसमधूनच मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. बहुतांश सर्व्हिस स्टेशन्स फ्रँचायजीच्या आधारित सुरू आहेत. मात्र त्यांच्या स्थानिक कर्मचाºयांना मारुती प्रशिक्षण देते. आतापर्यंत दुसरी कोणतीही आॅटोमोबाइल कंपनी मारुती सुझुकीने बनवलेला हा बेंचमार्क तोडू शकलेली नाही. सेकंडहँड कारचा वाढता बाजार पाहून   कंपनीने मारुती ट्रू व्हॅल्यूची सुरुवात केली. मार्च 2010 मध्ये जवळपास 341 ट्रू व्हॅल्यू आउटलेट्स उघडण्यात आले होते.

>    स्वत:ची फायनान्स सेवाही सुरू केली - बॉटमलाइन ग्रोथ करण्यासाठी जानेवारी 2002 मध्ये मारुती सुझुकी फायनान्स सेवेस सुरुवात करण्यात आली. ही सेवा सुरू करण्यापूर्वी कंपनीने ग्राहकांना सिटी ग्रुप व जीई कंट्रीवाइड या दोन संयुक्त उपक्रमांद्वारे कर्ज उपलब्ध करून दिले होते. याशिवाय मार्च 2003 मध्ये कंपनीने एसबीआयसोबत धोरणात्मक भागीदारी केली होती, जी सध्या 166 शहरांत उपलब्ध आहे.

>    निर्यातीवरही आहे तेवढेच लक्ष - मारुती एक्स्पोर्ट लिमिटेड मारुतीची सहयोगी कंपनी आहे. ती कारच्या परदेशातील निर्यातीवर लक्ष ठेवते. कंपनीने 480 कारचे पहिले कन्साइनमेंट हंगेरीस पाठवले होते. स्थापनेनंतर कार निर्यातीस प्रोत्साहन देणे हा सरकारचा पहिला उद्देश होता. प्रत्येक राजकीय पक्षाने मारुती सुझुकीच्या माध्यमातून परकीय चलन मिळवण्याची आशा बाळगली होती. अंगोला, बेनिन, डिजिबोटी, इथिओपिया, युरोप, केनिया, मोरोक्को, नेपाळ, श्रीलंका, युगांडा, चिली, कोस्टारिका, एल सालव्हाडोर अशा काही बाजारांत मारुती उद्योग लिमिटेड निर्यात करते. परदेशी बाजारातून मारुती सुझुकीला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो.



दरवर्षी 12.5 लाख वाहनांचे उत्पादन होऊ शकते गुडगाव व मानेसर प्रकल्पात

गुडगाव प्रकल्प 300 एकरवर पसरलेला आहे. त्यात तीन एकीकृत उत्पादन विभाग आहेत. या प्रकल्पाची दरवर्षीची उत्पादन क्षमता 3.50 लाख होती. मात्र उत्पादन क्षमता सुधारल्याने आता येथून दरवर्षी सात लाख वाहने बाहेर निघतात. या संपूर्ण प्रकल्पात जवळपास 150 रोबोट बसवलेले आहेत. त्यापैकी 71 स्वत: कंपनीने विकसित केले आहेत. येथे अल्टो, वॅगन आर, एस्टीलो, ओम्नी, जिप्सी व इकोचे उत्पादन होते. फेबु्रवारी 2007 मध्ये सुरू झालेला मानेसर प्रकल्प 600 एकरवर पसरलेला आहे. सुरुवातीस येथे एक लाख वाहनांचे उत्पादन होत असे. 2008 मध्ये ते वाढून तीन लाखांवर प्रतिवर्ष एवढे झाले. उत्पादन क्षमता नंतर 2.50 लाखांनी आणखी वाढवण्यात आली. आता मानेसरची वार्षिक उत्पादन क्षमता 5.50 लाख कार झाली आहे. मानेसर प्रकल्पात ए-स्टार, स्विफ्ट, स्विफ्ट डिझायर, एसएक्स 4 कार बनतात. देशभर विकल्या जाणाºया कारपैकी जवळपास अर्ध्या कार मारुती सुझुकीच्या असतात. 

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
9 + 2

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment