जाहिरात
Home >> International >> Pakistan >> Mumbai Terrorist Attack Reports For Illegal By Pakistan Court

मुंबई हल्ला चौकशी अहवालच बेकायदा; पाकिस्तानी न्यायालयाचे फर्मान

वृत्तसंस्था | Jul 18, 2012, 06:25AM IST
 
 


इस्लामाबाद- मुंबई हल्ल्याची चौकशी करणार्‍या पाकिस्तानी आयोगाचा अहवाल आज पाकिस्तानातील न्यायालयानेच बेकायदा ठरवला. भारतात येऊन पुरावे गोळा करणार्‍या पाकिस्तानी आयोगाचे पुरावे ग्राह्य धरले जाणार नाहीत असे रावळपिंडीच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे. दरम्यान, पाकिस्तानी न्यायालयाच्या या धक्कादायक पवित्र्यामुळे भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली असून आता पुढे काय करणार असा सवाल पाकिस्तानला के ला आहे.

मुंबई हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानात लष्कर ए तोयबाचा कमांडर झकीउर रेहमान लखवीसह सात जणांविरुद्ध खटला चालू आहे. या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी पाकिस्तानी सरकारी वकील,बचावपक्षांचा समावेश असलेल्या आठ सदस्यीय पथकाचा फौजफाटा मार्च महिन्यात भारताच्या दौर्‍यावर आला होता.या पथकाने एक न्यायधीश,वरिष्ठ पोलिस अधिकारी,दोन डॉक्टरांची भेट घेतली होती. या पथकाची कारवाई आणि अहवालच आता रावळीपिंडी दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायधीश चौधरी हबीब - उर-रेहमान यांनी बेकायदा ठरवला.

दरम्यान, न्यायालयाच्या या धक्कादायक फर्मानामुळे भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानी आयोगाने गोळा केलेल्या माहिती म्हणजे दोषींना शिक्षा ठोठावण्यासाठीची सबळ पुरावे होते. असे गृहसचिव आर.के.सिंग यांनी सांगितले. न्यायलयाच्या निकालावर सरक ारची काय भूमिका आहे यावद्दल पाकिस्तानकडे विचारणा करणार असल्याचे भारताने म्हटले आहे.

मुंबई येथे सन 2008 मध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्यात तीन पोलिस अधिकार्‍यांसह 166 जण ठार झाले होते.दहा दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता.यापैकी नऊ अतिरेक्यांचा खात्मा करण्यात कमांडोंना यश आले तर यामध्ये बचावलेला अजमल कसाब मुंबईच्या तुरुंगात आहे.

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
5 + 1

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment