जाहिरात
 
 
 

ओसाम बिन लादेनची माहिती मुशर्रफांना होती

 
Source: वृत्तसंस्था   |   Last Updated 00:57(16/02/12)
 
 
 

इस्लामाबाद - अल-कायदाचा म्होरक्या आणि मोस्ट वाँटेड अतिरेकी ओसाम बिन लादेन पाकिस्तानात लपून बसल्याची माहिती तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना होती असा खळबळजनक गौप्यस्फोट आयएसआयच्या माजी प्रमुखाने केला आहे.एवढेच नव्हे तर त्याला लपवण्याची व्यवस्थाही मुशर्रफांनीच केली होती असे त्यांनी सांगितले.

माजी आयएसआय प्रमुख  निवृत्त जनरल झियाउद्दीन ख्वाजा ऊर्फ झियाउद्दीन बट यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.सीआयएचे माजी अधिकारी ब्रुस रिडेल यांनी ही माहिती दिली.डेली बिस्ट वेबसाइटवर रिडेल यांनी एक लेख लिहिला आहे. या लेखात म्हटले आहे की,गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख ब्रिगेडियर इजाज शहा यांनी लादेनची अबोटाबादमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती.त्याची माहिती मुशर्रफांना होती. लादेनला अमेरिकेने 2 मे 2011 रोजी पाकिस्तानात घुसून मारले होते. लादेनचे घर अबोटाबादमध्ये लष्करी अकादमीपासून अगदी हाकेच्या अंतरावर होते.लादेन दडून बसल्याची माहिती कुणाला असावी हा प्रश्न अमेरिकेला सतावत होता.त्याचा उलगडा झाला. दरम्यान,बट यांनी रिडेल यांचा दावा फेटाळला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असून मी कोणताही तपशील दिलेला नाही असे बट यांनी सांगितले.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
2 + 10

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment