जाहिरात
 
 
 

उत्तर कोरियाकडे लांब पल्ल्यावर मारा करणा-या तोफा

 
Source: वृत्तसंस्था   |   Last Updated 23:25(22/02/12)
 
 
 
विज्ञापन

सेऊल - उत्तर कोरियाने चीन आणि रशियाच्या तंत्रज्ञानावर आधारित 170 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर मारा करणा-या बहुउद्देशीय तोफा विकसित केल्याचे वृत्त आहे. रशियाच्या जीपीएस साधनाद्वारे संचलित करण्यात येणा-या या तोफा तीन मीटरचे रॉकेट्स फायर करण्यास सक्षम असल्याचे वृत्त सेऊलच्या जुगांग एल्बो या वृत्तपत्राने दिले आहे. 

एका उच्चपदस्थ अधिका-याच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तात म्हटले आहे की, बहुउद्देशीय रॉकेट लाँचर तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी उत्तर कोरियाने   चिनी तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. या रॉकेट लाँचर्सची क्षमता 90 किलोमीटरपर्यंत वाढविण्याचा उत्तर कोरियाचा इरादा आहे. दक्षिण कोरियात अमेरिकेच्या 28,500 सैनिकांचा तळ आहे. सेऊलमध्ये असलेला हा तळ प्यॉयांगटेक येथे हलविण्याचा अमेरिकेचा इरादा आहे. दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने या वृत्तास दुजोरा देण्यास नकार दिला आहे. उत्तर कोरियाने सीमेलगत सेऊलपासून 40 किलोमीटर अंतरावरच  बहुविध रॉकेट लाँचर्स तैनात केल्यामुळे  दक्षिण कोरियाने आधीच चिंता जाहीर केली आहे. दक्षिण कोरियाच्या 4 कोटी 90 लाख लोकसंख्येपैकी अर्धी लोकसंख्या सेऊल आणि लगतच्या शहरात वास्तव्यास असून त्यांना कायम उत्तर कोरियाच्या रॉकेट आणि लांब पल्ल्याच्या तोफांच्या हल्ल्याच्या दहशतीखाली वावरावे लागते.

अमेरिकी तळ लक्ष्य - उत्तर कोरियाने विकसित केलेले 170 किलोमीटर पल्ल्याचे रॉकेट लाँचर सेऊलच्या दक्षिणेस 65 किलोमीटर अंतरावर सध्या प्यॉयांगटेक येथे निर्माणाधीन असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर सहजपणे हल्ला करता येऊ शकतो, असे या वृत्तात म्हटले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
5 + 5

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment