Home » International » Other Country » NASA Scientists Spot Pearl-Coloured 'flower' On Mars

नासाला मंगळावर आढळले फुल!

वृत्तसंस्‍था | Jan 07, 2013, 13:19PM IST
नासाला मंगळावर आढळले फुल!

वॉशिंग्‍टन- मंगळाच्या खडकाळ पृष्ठभागावर फुलांप्रमाणे रचना आढळली आहे. त्‍यामुळे मंगळावर फुले उमलत असावी, अशा चर्चेला ऊत आले आहे. या फुलाला 'मंगळाचे फूल' असे नाव देण्यात आले आहे.

नासाने दिलेल्‍या माहितीनुसार, फुलाच्‍या रचनेचा रंग एखाद्या मोत्‍याप्रमाणे आहे. नासाच्या क्युरिओसिटी रोव्हरने डिसेंबर 2012 मध्ये ही रचना टिपली होती. चित्रात खडकाळ पृष्ठभागावर अतिशय आकर्षक अशी पाकळ्यांप्रमाणे रचना दिसत आहे. काही हौशी अभ्‍यासकांच्‍या मते हा खडकातील एखादा चमकदार भाग असू शकतो. तर हे खरोखरच फुल असावे आणि ते नुकतेच उमलत आहे, असेही मत काहींनी मांडले.

नासाने मात्र फुलाचे अस्तित्त्व नाकारले आहे. प्रवक्ते गाय वेबस्‍टर यांनी सांगितले की, या आकाराला काहीजणांनी फूल म्हटले आहे. परंतु, ते फुल नाही. कदाचित खडकाचाचा एखादा भाग समोर आला आहे, असे दिसते.

ऑक्टोबर 2012 मध्येही मंगळावर फूल आहे की काय, अशा चर्चेला ऊत आला होता; पण नंतर तो रोव्हरवरून पडलेला एक प्लास्टिकचा तुकडा निघाला होता.

Email Print
0
Comment