Home » International » Other Country » No Conversation With India : Maldive

नाशिदबाबत भारताशी चर्चा नाही : मालदीव

वृत्तसंस्था | Feb 15, 2013, 06:47AM IST
नाशिदबाबत भारताशी चर्चा नाही : मालदीव

माले - माजी राष्‍ट्राध्यक्ष मोहंमद नाशीद प्रकरणात भारताशी कसलीही चर्चा केली जाणार नाही, असे मालदीवने म्हटले आहे. नाशीद यांच्या अटक वॉरंटची मुदत संपली असून ते भारतीय दूतावासातून बाहेर येऊ शकतात. अटक वॉरंट जारी केल्यानंतर नाशीद यांनी मालेतील भारतीय वकिलातीत आश्रय घेतला आहे.

भारताने नाशीद यांच्या अटकेनंतर द्विपक्षीय चर्चा करण्याऐवजी सार्वजनिक स्तरावर टिप्पणी केली ही गंभीर बाब आहे, असे मालदीवच्या परराष्‍ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. नाशीद राष्‍ट्राध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांना सुरक्षा पुरवली जावी, अशी प्रतिक्रिया भारताने बुधवारी दिली होती. त्यावर निवडणूक आयोगाने अद्याप उमेदवारांची यादी जारी केली नसल्याचे परराष्‍ट्र मंत्रालयाने म्हटले होते. दुसरीकडे मालदीवचे राष्‍ट्राध्यक्ष मोहंमद वहीद यांनी राजीनामा द्यावा. तसेच निष्पक्ष निवडणुकीसाठी प्रभारी सरकार स्थापन करण्याची मागणी नाशीद यांनी केली आहे. मालदीवच्या जनतेचे हक्क हिरावले जाऊ नयेत यासाठी परराष्‍ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल समद अब्दुल्ला यांच्याशी जवळपास 40 मिनिटे चर्चा केली.

Email Print
0
Comment