जाहिरात
Home » International » Other Country » On Mars 1500 Kilometer River's Relice,Say Eropean Space Institute

युरोपीय अंतराळ संस्थेचा अभ्यास:मंगळावर 1500 किमी नदीचे अवशेष

वृत्तसंस्था | Jan 19, 2013, 05:05AM IST
युरोपीय अंतराळ संस्थेचा अभ्यास:मंगळावर 1500 किमी नदीचे अवशेष

लंडन - मंगळावर एकेकाळी हजारो किलोमीटर लांब अशी नदी होती, असा दावा करणारे छायाचित्र युरोपीय अंतराळ संस्थेकडून (ईएसए) शुक्रवारी जारी करण्यात आले. सुमारे दीड हजार किलोमीटर लांब आणि सात किमी रुंद पात्र असलेल्या नदीच्या खाणाखुणा छायाचित्रात दिसून आल्या आहेत.  

 हाय रिझोल्युशन स्टिरिओ कॅम-या च्या मदतीने मंगळावरील स्थितीची छायाचित्रे काढण्यात आली आहेत. निरीक्षणातून मंगळावरील भौगोलिक स्थितीचा आढावा घेण्यात अंतराळवीरांना यश आले आहे, असे ईएसएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पाण्याचा मोठा प्रवाह असतानाच मंगळ ग्रहाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती. नदीच्या प्रवाहाप्रमाणे नागमोडी वळण घेणा-या  स्पष्ट मोठ्या खुणा या लाल ग्रहाच्या भूपृष्ठावर दिसून येतात. कालौघात येथील रचनेत बरेच बदल झाले. सौर वादळे किंवा इतर कारणांमुळे भूपृष्ठावर अनेक खुणा निर्माण झाल्या असाव्यात. त्याला अ‍ॅमेझॉनियन काळ असे म्हटले जाते, असे तज्ज्ञांना वाटते.  

 सुमारे 1.8 अब्ज वर्षांपूर्वी या लाल ग्रहावर पाण्याचे अस्तित्व होते. एका विशिष्ट खो-या त बर्फाचेही मोठे प्रमाण होते. त्याचबरोबर काही ठिकाणी ज्वालामुखीचे पर्वतही असल्याचे दिसून आले आहे. छायाचित्रातील उत्तरेकडील भागात उंच डोंगररांगा दिसून येतात. पात्रामधील खडकाच्या उंच भिंती आणि ज्वालामुखीच्या खुणाही त्यातून दिसून येतात. खो-या चा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर या भूपृष्ठावर अतिशय गुंतागुंतीची परिस्थिती असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

BalGopal Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
8 + 9

 
 
 
जाहिरात
BalGopal Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment