Home » International » Pakistan » Pakistan Parliamentary Panel Seeks Ban On Indian TV Shows During Prime Time

भारतीय मालिकांवर पाकिस्तानात बंदी

वृत्तसंस्था | Jan 05, 2013, 01:54AM IST
भारतीय मालिकांवर  पाकिस्तानात बंदी

इस्लामाबाद- भारतासह सर्व परदेशी भाषेतील मालिकांना प्राइम टाइममध्ये स्थान दिले जाऊ नये. अशा कार्यक्रमावर बंदी घालण्यात यावी, अशी सूचना संसदीय समितीने पाकिस्तान सरकारला केली आहे. पीपल्स पार्टीचे लोकप्रतिनिधी बेलम हस्नैन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माहिती आणि प्रसारणाची स्थायी समितीच्या सदस्यांनी अशा बंदीची शिफारस केली आहे. देशातील सर्व टीव्ही वाहिन्यांसाठी हा नियम बंधनकारक केला गेला पाहिजे. त्याचे उल्लंघन करणाºया वाहिन्यांवर कडक कारवाईची तरतूद करावी, असेही समितीने म्हटले आहे. बैठकीला माहिती सचिव रशीद अहमद, टीव्ही अभिनेता कावी खान, लैला झुबेरी, मारिया वास्ती आदींची उपस्थिती होती.


पाकिस्तानातील अनेक आघाडीच्या टीव्ही वाहिन्या तुर्की मालिकांना प्राइम टाइममध्ये प्रसारित करतात. तुर्की मालिकांचे उर्दूमध्ये डबिंग करून त्या प्रसारित केल्या जातात. मुस्लिम पात्र आणि वातावरण असलेल्या मालिका पाकिस्तानात चांगल्याच लोकप्रिय ठरल्या आहेत. परदेशी मालिकांमुळे घरगुती टीव्ही उद्योगाचे नुकसान होत आहे.

 
 
जाहिरात

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print
0
Comment