लॉस एंजिल्स - पॉप स्टार मायकेल जॅक्सनचे हात आणि पायाच्या मुद्रा असलेले शिल्प हॉॅलीवूडमध्ये स्थापित करण्यात आले आहे. चायनीज थिएटरच्या आवारात या पॉप आयकॉनला अशा प्रकारे रुपेरी जगताकडून अमरत्व प्रदान करण्यात आले आहे.
जॅक्सनच्या प्रिन्स (14), पॅरिस (13), ब्लँकेट (9) या मुलांनी वडिलांच्या हँडग्लोव्हवरून छापे तयार करण्यास मदत केली. जॅक्सनच्या ऐतिहासिक डान्सिंग शूजवरून पायाचे ठसे तयार करण्यात आले आहेत. या शिल्प उभारणीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात किशोरवयीन कलाकार जस्टिन बायबरने जॅक्सनचे हिट रॉकिन व रॉबिनचा परफॉर्मन्स दिला. जॅक्सन माझ्यासाठी खूप काही आहे. तुमच्यासाठीही तो असाच मोठा माणूस आहे, याची मला जाणीव आहे. एन्टरटेनरच्याही तो पलीकडचा होता. तो असंख्य जणांची प्रेरणा होता. तो मृदू आणि दानशूरही होता. त्यामुळेच मी या कलाकाराकडे पाहते. त्याच्यासारखे काही करण्याचा प्रयत्न करते, असे बायबरने उपस्थित गर्दीशी बोलताना सांगितले.
चायनीज थिएटरच्या बाहेर हॉलीवूडमधील मोठी नावे कोरलेली आहेत. अशा बड्या हस्तीच्या हात व पायांच्या मुद्रा उमटवलेल्या दिसून येतात. यात मर्लिन मन्रो, बॉब होप, कॅरी ग्रँट यांचा यात समावेश आहे.
अलीकडेच ब्रॅड पिट, जॉर्ज क्लूनी व मॅट डॅमोन, हॅरी पॉटर स्टारच्याही मुद्रा लावण्यात आल्या होत्या.