जाहिरात
 
 
 

कुराण जळीत प्रकरणाचा विरोध करणा-या आंदोलकांवर गोळीबार

 
Source: वृत्तसंस्था   |   Last Updated 15:24(22/02/12)
 
 
 
विज्ञापन

काबुल - अमेरिकी सैन्याकडून कुराणाच्या प्रती जाळण्यात आल्याच्या कथीत आरोपानंतर अफगानिस्तानमध्ये आंदोलन हिंसक झाले. कुराणाच्या कथीत जळीत प्रकरणाचा विरोध करण्यासाठी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक उग्र झाल्यानंतर त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी गोळीबार करण्यात आला. यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

तिथे उपस्थित एका छायाचित्रकाराने दिलेल्या माहीतीनुसार, तीन आंदोलक जखमी झाले. त्यातील एकाच्या पायाला गोळी लागली तर दुस-याच्या हाताला गोळी लागली आणि एकाच्या हाताला रक्त लागलेले होते.

पोलिस प्रवक्ता अश्मत एस्तनकजई म्हणाले, जलालाबाद रोडवरील अमेरिकेच्या फिनिक्स कँपवरील हल्ल्यानंतर आंदोलक हिंसक बनले. मोठ्या प्रमाणात आंदोलक हे काबुलच्या दिशेने येत आहेत. त्यांना तिथल्या तिथे थांबविण्याचे कसोशिने प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी पोलिसांची अधिक कुमक मागविण्यात आली आहे.

आंदोलक हिंसक झाले आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ सुरु केली आहे. ते ज्या दिशेने येत आहेत तेथील दुकाने आणि रस्त्यातील कार आगीच्या भक्षस्थानी दिल्या जात आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
5 + 9

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment