जाहिरात
 
 
 

देहव्यापार प्रकरणात स्ट्रॉस कान यांना अटक

 
Source: वृत्तसंस्था   |   Last Updated 23:45(21/02/12)
 
 
 

पॅरिस - देहव्यापार प्रकरणात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख डॉमिनिक स्ट्रॉस कान यांना मंगळवारी पोलिसांनी अटक केली. सेक्स पार्ट्यांसाठी एका कंपनीच्या पैशांचा दुरूपयोग केल्याप्रकरणी त्यांच्या चौकशी केली जाणार आहे.

कान यांना 48 तासांसाठी पोलिस आपल्या ताब्यात ठेवणार असून त्यांची कसून चौकशी होणार आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात मोठ्या संख्येने पोलिस तसेच प्रशासकीय अधिकारी देखील आरोपी आहेत. कान यांची फ्रान्सच्या लिले शहरात चौकशी केली जात आहे. देशात तसेच बेल्जियममध्ये देह व्यापार पसरला आहे. या देह व्यापाराच्या जाळ्याअंतर्गत या सेक्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते का तसेच यात कंपनीचा पैसा वापरण्यात आला होता का, याचा शोध पोलिस घेत आहेत. फ्रान्सचे माजी अर्थमंत्री असलेले 62 वर्षीय कान हे 2012 च्या राष्ट्रपती निवडणुकीचे प्रमुख दावेदार होते. परंतु मे मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील एका हॉटेलमध्ये महिला कर्मचा-यासोबत कुकृत्य करण्याचे प्रकरण उजेडात आले होते. त्यानंतर कान यांना आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे पद सोडावे लागले होते. त्यातच त्यांची राष्ट्रपती पदाची उमेद्वारीही निघून गेली. या प्रकरणात कान यांचे दोन निकटचे उद्योजक व एक पोलिस आयुक्तही सहभागी आहेत. या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
2 + 1

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment