Home » Khabrein Jara Hat Ke » This Hotel Look Like Horse Nel

घोड्याच्या नालेप्रमाणे दिसते हे हॉटेल!

दिव्य मराठी नेटवर्क | Feb 11, 2013, 12:26PM IST
घोड्याच्या नालेप्रमाणे दिसते हे हॉटेल!

जगातील सर्वात मोठे तसेच दुस-या क्रमांकाचे सर्वात जुने हॉटेल शेरटॉन या वर्षभरात अनेक नवीन हॉटेल्स सुरू करणार आहे. यापैकी 15 हॉटेल्स एकट्या चीनमध्ये असतील. ही सर्व हॉटेल्स घोड्याच्या नालेप्रमाणे अद्‍भूत दिसणारे असण्याची अपेक्षा आहे. याचे डिझाइन बीजिंग येथील मॅउ आर्किटेक्ट्स फर्मचे वास्तुरचनाकार मायानसाँग यांनी केले आहे. या फर्मने कॅनडामध्ये अशाच प्रकारचे अद्भुत अ‍ॅब्सोल्युट टॉवर उभारले होते.

चीनच्या झेजियांग प्रांतातील ताइहू सरोवराच्या दक्षिण किना-या वर 81 अब्ज रुपये खर्चातून उभारले जाणारे शेरटन हुजहोऊ हॉट स्प्रिंग रिसॉर्ट 100 मीटर उंच आणि 116 मीटर रुंद आहे. हे हॉटेल 75 एकर जागेवर उभारले आहे. यामध्ये 321 खोल्या आहेत. रात्री येथे निरनिराळ्या एलईडींच्या प्रकाशात हॉटेल अत्यंत सुंदर दिसते.
(popsci.com)

जाहिरात
Email Print Comment