Home » International » Other Country » This Vehicle Can Drive Through A Major IED Blast With No Casualties

स्फोटातही कॉगर राहाते सुरक्षित, कोणत्याही संकटाचा समाना करण्यास तयार

वृत्तसंस्था | Feb 09, 2013, 12:52PM IST
स्फोटातही कॉगर राहाते सुरक्षित, कोणत्याही संकटाचा समाना करण्यास तयार

इम्प्रवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) कोणत्याही युद्धातील सैनिकांसाठी मोठी डोकेदुखी असते. आयईडीची शिकार इराक आणि अफगाणिस्तान युद्धात अमेरिका आणि नाटोचे सैनिक झाले होते. या संकटाचा सामना करण्यासाठी नवीन मिलीट्री वाहन कॉगरची निर्मीती करण्यात आली आहे. कॉगरमध्ये आयईडी स्फोटांना सहन करण्याची शक्ती आहे. स्फोटानंतरही सैनिक त्यातून सुरक्षित बाहेर पडू शकतात. त्यामुळे हे वाहन अधिक फायदेशीर मानले जात आहे.

अ‍ॅडव्हान्स बॅलिस्टिक आणि ब्लास्ट प्रोटेक्टेड कॉगर सैनिकांना युद्धावरुन घरी परतण्याची गॅरंटी देते. इराण आणि अफगाणिस्तानच्या सैनिकासांठी हे फार सुरक्षित मानले जात आहे. कारण तिथे हजारोंच्या संख्येने आयईडी आणि भुसूरुंग पेरलेले असतात.

स्फोटानंतर कॉगरमध्ये किरकोळ बिघाड होतो. मात्र, त्याच्या दुरुस्तीनंतर त्याला लगेच वापरात आणता येते. त्याची उपयुक्तता लक्षात आल्यानंतर कॅनडा, इराक आणि युकेमध्ये त्याची मागणी वाढली आहे.

 
 
जाहिरात

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print
0
Comment