Home » International » Other Country » Today Smail Sattalite Pass To The Earth ,But No Risk ; Looking Asia,Australia

पृथ्वीजवळून आज लघुग्रह जाणार, परंतु धोका नाही ; आशिया, ऑस्ट्रेलियात दिसणार

वृत्तसंस्था | Feb 15, 2013, 06:36AM IST
पृथ्वीजवळून आज  लघुग्रह जाणार, परंतु धोका  नाही ; आशिया, ऑस्ट्रेलियात दिसणार


न्यूयॉर्क- लहान आकाराचा ‘2092 डीए 14’ उपग्रह शुक्रवारी पृथ्वीच्या जवळून जात आहे. रात्री 12.10 वाजता हा लघुग्रह पृथ्वीपासून 27 हजार 700 कि.मी. अंतरावरून जाईल. ताशी 7.8 कि.मी. गतीने जाणारा हा उपग्रह इंडोनेशिया, पूर्व युरोप, आशिया व ऑस्ट्रेलियातून दुर्बिणीने दिसू शकेल. या ग्रहाचा पृथ्वीला कृत्रिम उपग्रहांना कोणताही धोका नसल्याचे ‘नासा’ने म्हटले आहे.

हाच लघुग्रह यानंतर 2019 मध्ये पृथ्वीजवळून जात आहे. मात्र तेव्हा त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर एक कोटी 91 लाख 78 किलोमीटर असेल. दरम्यान शुक्रवारीच ‘1999 वायके 5’नामक लघुग्रह पृथ्वीजवळून जात असून त्याचे अंतर 1 कोटी 88 लाख किलोमीटर असेल. या लघुग्रहाची गती प्रतिसेकंद सुमारे 20 किलोमीटर असेल.
फुटबॉल मैदानाच्या निम्म्या आकाराचा हाच लघुग्रह यानंतर 2019 मध्ये पृथ्वीजवळून जाणार आहे.

Email Print
0
Comment