जाहिरात
Home >> International >> Pakistan >> Turmoil In Pakistan After Prime Minister Yousuf Raza Gilani Dismissed

गिलानींची हकालपट्टी, शहाबुद्दीन होणार पाकचे नवे पंतप्रधान?

वृत्तसंस्‍था | Jun 20, 2012, 04:01AM IST
 
 


इस्लामाबाद- पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाने पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना पंतप्रधानपदासाठी मंगळवारी अपात्र ठरवले. त्यांचे संसदेतील सदस्यत्वही रद्द करण्यात आले असून निवडणूक लढवण्यास त्यांच्यावर 5 वर्षांची बंदी लादण्यात आली आहे. तीनसदस्यीय पीठाने हा निकाल दिला. राष्‍ट्रपती आसिफ अली झरदारी यांना नवे पंतप्रधान नियुक्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

गिलानी यांची हकालपट्टी झाल्‍यानंतर पाकिस्‍तान पीपल्‍स पार्टीने वरिष्‍ठ नेते मखदूम शहाबुद्दीन यांचे नाव पंतप्रधानपदाच्‍या उमेदवारीसाठी जा‍हीर केले. रात्री उशीरा संपलेल्‍या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्‍यात आला. तसेच नवे पंतप्रधान नियुक्त करण्‍यासाठी अध्‍यक्ष आसिफ अली झरदारी यांना सर्वाधिकार देण्‍यात आले आहेत.

सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) सुप्रीम कोर्टाचा निकाल मान्य केला. पक्षाचे सरचिटणीस आणि प्रवक्ते जनरल जहांगीर बदर म्हणाले, राष्‍ट्रपती आसिफ अली झरदारी बुधवारी रशियाच्या दौ-यावर जात आहेत.

लवकरच नव्या पंतप्रधानांचे नाव जाहीर होईल, अशी आशा आहे. गेल्या 26 एप्रिल रोजी गिलानी यांना एका अवमान प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दोषी ठरवले होते. कायद्यानुसार तेव्हापासूनच ते पंतप्रधानपदासाठी अपात्र असल्याची निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले.

झरदारींना वाचवण्याच्या नादात स्वत:ची खुर्ची गमावली

आरोप

कोट्यवधी डॉलर्सचा काळा पैसा बॅँकेत ठेवल्याबद्दल झरदारी व बेनझीर भुट्टोंना 2003मध्ये स्वीस कोर्टाने दोषी ठरवले. 2008मध्ये मुशर्रफ यांनी त्यांची प्रकरणे बंद करण्याचे आदेश दिले. डिसेंबर 09मध्ये पाक कोर्टाने हे आदेश बेकायदेशीर असल्याचे म्हणत गिलानींवर कारवाईचे निर्देश दिले होते.

अवमान

सुप्रीम कोर्टाचा आदेश धुडकावल्याचा आरोप गिलानींवर होता. झरदारींवरील खटले सुरू करण्यासाठी स्वीस अधिका-यांना पत्रे लिहिली नाहीत. झरदारी राष्‍ट्रपती आहेत तोवर त्यांच्याविरुद्ध खटला चालवला जाऊ शकत नाही, ही भूमिका अवमान करणारी असल्याचे सुप्रीम कोर्टाने नमूद केले. यासाठी 26 एप्रिलला त्यांना 20 सेकंदांची शिक्षाही ठोठावण्यात आली.

आदेश

राष्ट्रपतींना नवा पंतप्रधान निवडावा. तसेच निवडणूक आयोगाने गिलानींच्या अपात्रतेसंबंधी अधिसूचना जारी करावी, असे सुप्रीम कोर्टाचे आदेश.

शक्यता

> गिलानी 26 एप्रिलपासूनच  अयोग्य असतील तर 19 जूनच्या त्यांच्या निर्णयाचे काय होणार?

> तेव्हापासूनचे निर्णय व आंतरराष्‍ट्रीय करार मान्य होतील का?

परिणाम

पाकिस्तानवर

नवाज यांची पीएमएल-एन व इम्रानची तहरिक-ए-इन्साफ पार्टी मजबूत होईल.

आर्थिक स्थिती ढिसाळ आहे, या घडामोडीमुळे ती आणखी खालावेल.

वायव्य भाग आणि बलुचिस्तानमध्ये अतिरेकी हल्ल्यांची शक्यता.

... आणि भारतावर

सचिवस्तरीय चर्चा सुरू  राहील, मात्र आपसांतील मतभेद मिटवण्याचे प्रयत्न कमी पडतील. सियाचीनमध्ये लष्कर माघारी घेण्याची, सर क्रिक वाद मिटवण्यातही अडचणी येतील.

शंका

13वा अपयशी देश

अमेरिकी मासिक फॉरेन पॉलिसीने जगातील सर्वात पाच अपयशी देशांत पाकला 13वे स्थान दिले आहे. स्ट्रॅटफोरस्थित प्रमुख विश्लेषक रॉबर्ट डी कपलाननुसार, पाकमध्ये लष्कराची दखल सुरू असते. अनेक ठिकाणी रोज 20 तास वीज नसते, शिक्षण नाममात्र, राजकीय अराजकतेमुळे स्थिती आखणीच बिघडेल.

न्या. इफ्तिखार चौधरी यांचा दुसरा मोठा निकाल- मुशर्रफ यांचा आणीबाणीचा निर्णय चौधरी यांनी रद्द केल्यानंतर त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. तेव्हा याविरोधात देश एकवटला. परिणामी चौधरींना पुन्हा पद बहाल केले.

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
3 + 6

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment