जाहिरात
 
 
 

D.Ed. CET चा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना बँकांमध्ये नोकरीची पर्यायी संधी

 
Source: जयंत मोकाशी   |   Last Updated 05:48(22/02/12)
 
 
 

महाराष्ट्र शासनाने सन 2008 पासून शिक्षण सेवक भरतीसाठी (आता परिवीक्षाधीन शिक्षक) सामायिक परीक्षा घेण्यास सुरुवात केली.  ही परीक्षा ऑगस्ट 2008 आणि मे 2010 अशा प्रकारे दोनदा घेण्यात आली. आता परत शिक्षण सेवक भरतीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे जीआर प्रसिद्ध करण्यात आला. यानुसार जवळजवळ 32 हजार रिक्त जागा भरायच्या आहेत. यामध्ये परिवीक्षाधीन शिक्षक 12600, मुख्याध्यापक पदासाठी यापेक्षाही अधिक जागा आहेत. पण त्या पदोन्नतीने भरावयाच्या आहेत.

रिक्त जागांनुसार व गरजेनुसार याची जाहिरात लवकरच येईल.  पण गतवर्षी झालेल्या पटपडताळणीचा अहवाल शासनातर्फे रीतसर मागवण्यात आला आहे. मे 2010 मध्ये अशीच काहीशी संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली होती. ब-याच शिक्षण पदविकाधारक विद्यार्थ्यांनी परीक्षा होणार नाही असे गृहीत धरून अभ्यास केला नाही व काहींनी क्लासेस लावून अर्ध्यात सोडून दिले. पाहता पाहता याची जाहिरात देऊन शासनाने सामायिक परीक्षा घेऊन टाकली. बरेचसे परीक्षार्थी दोन, पाच, दहा अशा कमी फरकाने निश्चित करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीपासून दूर राहिले.

साहजिकच आता नवीन .d.ed. cet  धारक व दोन वर्षांपासून तयारी करण्यात मग्न असलेले .d.ed. cet  धारक या परीक्षेची तयारी करत आहेत व तयारी सुरू  ठेवावी.

.d.ed. cet  च्या अभ्यासक्रमामध्ये व mpsc-pdi/sti/asst  या परीक्षेच्या अभ्यासामध्ये बरेचसे साधर्म्य आहे. जे विद्यार्थी d.ed. cet  चा अभ्यास करतात आहेत, त्यांना इतरही संधी आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पर्यायी करिअरच्या संधी अजमावून पाहाव्यात हे करण्यासाठी d.ed. cet   चा अभ्यास बंद करण्याची गरज नाही. पण तुलनात्मक व सर्वसमावेशक अभ्यास करावा. त्यासाठी master plan तयार करावा. थोडक्यात d.ed. cet  चा अभ्यासक्रम व मार्कांची विभागणी यांची माहिती करून घेऊया.

विषय    मार्क

मराठी    20

इंग्रजी    20

जी.के.    25 (5 चालू घडामोडी + 20 कला शाखा घटक)

विज्ञान    50

गणित     50

d.ed. cet अभ्यासक्रम  35

एकूण    200

वरील अभ्यासक्रमानुसार मे 2010 मध्ये परीक्षा झालेली आहे. यासाठी दोन तासांचा कालावधी होता. याप्रमाणे प्रत्येकी प्रश्न 36 sec असा वेळ आहे. d.ed. cet  च्या सामायिक परीक्षेमध्ये व अभ्यासक्रमामध्ये बदल होत आहे, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार बुद्धिमत्ता हा विषय सामावण्यात आलेला आहे आणि इतर विषयांचे मार्क कमी करण्यात आलेले आहेत, असा काहीसा अभ्यासक्रम ठरवण्यात येत आहे. पण जोपर्यंत यासंदर्भात विभागाकडून ऑफिशियल कम्युनिकेशन होत नाही व अभ्यासक्रम जाहीर होत नाही तोपर्यंत वरील पद्धतीप्रमाणे अभ्यास चालू ठेवावा.

d.ed. cet  च्या अभ्यासक्रमामध्ये अंकगणित, चालू घडामोडी, इंग्रजी हे विषय आहेत. यानुसार सध्या बँकेमध्ये महाभरती   सुरू आहे. यामध्ये गणित, इंग्रजी, चालू घडामोडी, कॉम्प्युटर व बुद्धिमत्ता हे विषय आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
1 + 7

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment