जाहिरात
Home » Magazine » Madhurima » Blue Tooth

ब्लू टुथ

भाग्यश्री केंगे | Jan 18, 2013, 06:23AM IST
ब्लू टुथब्ल्यू टूथ ही वायरलेस टेक्नोलॉजी वापरून कमी अंतरावर डेटा पाठवायची अत्यंत उपयुक्त सोय आहे. ब्ल्यूटूथमुळे संगणकाच्या वायरीच्या जाळ्यापासून थोडे दूर राहता येते. विशिष्ट रेडिओ लहरी वापरून ब्ल्यूटूथ छोटे नेटवर्क स्थापन करते आणि डेटा पाठवते. ब्ल्यूटूथ अत्यंत सुरक्षित असून आठ वेगवेगळ्या यंत्रांना एका वेळेला जोडू शकते. ब्ल्यूटूथची छोटी चकती किंवा चिप संगणक, डिजिटल कॅमेरा, मोबाइल फोन, फॅक्समध्ये बसवता येते. फोटो, गाणी किंवा इतर डेटा एका मोबाइलमधून दुस-या  मोबाइल किंवा संगणकामध्ये देण्यासाठी ब्ल्यूटूथचा फार उपयोग होतो.
ब्ल्यूटूथ कसा वापरावा?
सर्वात प्रथम मोबाइल किंवा संगणकावर ब्ल्यूटूथची सोय आहे की नाही हे   तपासून पहावे. नसल्यास त्यासाठी डोंगल वापरावे लागेल, ज्यामुळे तुम्हाला ब्ल्यूटूथ टाकता येईल. आता ब्ल्यूटूथ वापरण्याची सर्वसाधारण पद्धत पुढीलप्रमाणे :
  ब्ल्यूटूथ चालू करा.  तुमच्या यंत्रातील ( मोबाइल/संगणक) ब्ल्यूटूथ बंद (hidden) नसून उघडा (visible) आहे ना याची खात्री करून घ्या. जेणेकरून जवळच्या यंत्रांना सिग्नल अथवा सूचना मिळतील. तुमच्या यंत्राला विशिष्ट नाव द्या म्हणजे दुस-या  यंत्राशी संपर्क साधतांना ते सहज कळेल.
ब्ल्यूटूथ कनेक्शन असे स्थापन करा :
  सर्वात प्रथम कोणती फाइल पाठवायची ती शोधून ठेवा. आता ती फाइल ब्ल्यूटूथने पाठवायचा पर्याय निवडा. तुमचे यंत्र त्याच्या कक्षेतल्या इतर यंत्रांना शोधून दाखवेल.  स्क्रोल करून ज्या यंत्राशी कनेक्ट करायचे आहे ते सिलेक्ट करा.काही यंत्राच्या पेअरिंगसाठी तुम्हाला पासवर्डची गरज भासू शकते.  एकदा दोन यंत्रांमध्ये कनेक्शन स्थापन झाल्यावर डेटा पाठवायला सुरुवात होते.
ब्ल्यूटूथ किती सुरक्षित आहे ?
  जर तुम्ही एखादी गोपनीय माहिती वायरलेस नेटवर्कमधून पाठवत असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे.जेव्हा एखादे यंत्र तुमच्याशी कनेक्ट होते तेव्हा तुम्ही त्याला विचारपूर्वक हो म्हणायला हवे. तुम्ही विश्वासार्ह यंत्रांची एक यादीच वेगळी करू शकता, ज्यांच्यावरून परवानगी न घेता डेटा पाठवणे सहज शक्य होईल. त्याबरोबर तुम्ही तुमची सुरक्षितता वाढवून माहिती नसलेले यंत्र कनेक्ट न होऊ देण्याची खबरदारी घेऊ शकता.
ब्ल्यूटूथ नाव आले कोठून ?
ब्ल्यूटूथ हे मूळ स्कँडिनेव्हियन टेक्नोलॉजीचे देणे आहे. 10व्या शतकात डॅनिश राजा हॅरोल्ड ब्लॅटॅडच्या नावावरून हे नाव आले. आख्यायिका सांगितली जाते की हॅरोल्डला ब्ल्यूबेरीज इतक्या आवडायच्या की त्या खूप खाल्ल्यामुळे त्याचे दात निळे झाले होते. म्हणूनच नाव पडले ब्ल्यूटूथ!
shree@marathiworld.com

वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
3 + 8

 
 
 
जाहिरात

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment