जाहिरात
 
 
 

करिअर नियोजनाचे ‘नवरंग’

 
Source: गिरीश टिळक   |   Last Updated 22:31(21/02/12)
 
 
 

आपल्या करिअरचे नियोजन करणे ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची गोष्ट व पायरी मानली जाते. आता हे करिअरचे नियोजन कसे करावे याचा आपण सखोलपणे आढावा घेऊ.

Never Stop Learning -‘म्हणतात ना माणूस मरेपर्यंत विद्यार्थी असतो.’  म्हणूनच आयुष्यभर शिकत राहणे ते फार महत्त्वाचे आहे. आता आपण जगप्रसिद्ध खेळाडू सचिन तेंडुलकर व तबलानवाझ उस्ताद झाकीर हुसेन यांचे उदाहरण घेऊया. आज सर्व विक्रम मोडल्यानंतरसुद्धा सचिन तेंडुलकर म्हणतो की, अजूनही शिकायचे. तसेच तबल्यातले सर्वोच्च नाव झाकीर हुसेन हेही म्हणतात, ‘बहोत कुछ सिखना बाकी है,  मैं तो एक छोटासा कलाकार हूं.’ त्यामुळे नवनवीन संधी शोधताना शिकत राहणे हे फार महत्त्वाचे आहे.

Ask, Listen and Learn - उत्तम श्रोता हा नेहमीच खूप काही शिकत असतो. चांगले ऐकण्यामुळे खूप फायदा होतो. नवनवीन गोष्टी कळतात, समजतात. मोठ्या लोकांचे अनुभव तसेच विचार ऐकून खूप काही शिकण्यास मिळते. एखादा विषय न समजल्यास त्याबद्दल चौकशी करणे हेही फार महत्त्वाचे आहे.

Fuifill Your Current Job - तुमची सध्याची नोकरी ही तुमच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते. कदाचित तिथेच तुमचे यशस्वी करिअर घडण्यास मदत होते. तुमच्या वरिष्ठांशी विचारांची देवाणघेवाण करा. त्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडू शकेल.

Build Your Network - तुमचे इतर लोकांशी कसे संबंध आहेत यावर बरेच काही अवलंबून असते. त्यामुळे संपर्क वाढवणे तसेच नवीन व्यक्तींशी ओळख वाढवताना जुन्या लोकांशी संपर्कात राहणेही तितकेच महत्त्वाचे व फायदेशीर ठरते. याच संपर्कातून नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.

Identify Your Current Job - जेव्हा तुम्ही कोणत्याही नवीन नोकरीत रुजू होता तेव्हा त्या नोकरीच्या सर्व गरजा समजून घेणे अत्यंत आवश्यक असते. तरच तुम्ही पूर्ण प्रयत्न करून व्यवस्थित व यशस्वीपणे काम करू शकता.

Identify Your Next Job - करिअर नियोजन करताना हे लक्षात ठेवा की, तुम्ही तुमच्या मनासारखा जॉब शोधत आहात. तेव्हा त्याची पूर्ण माहिती करून घ्या आणि तिथे रुजू झाल्यानंतर पूर्ण सामर्थ्यानिशी प्रयत्न करा व यशस्वी व्हा.

Prepare Your Self - तुमचा करिअर पाथ नेहमी  updated ठेवा. तुमचा CV नेहमी  updated  करा म्हणजे तुमची नजीकच्या काळातली यशस्वी कामे दर्शवण्यास मदत होईल.

Pick The Right Tools - वेगवेगळे पर्याय निवडा व त्यांच्या मदतीने तुमचे करिअर यशस्वीरीत्या घडवा. चांगली पुस्तके वाचून, ज्ञानात भर पाडून तुमचे करिअर समृद्ध करता येईल. वेगवेगळे कोर्सेस करून तुमचे ज्ञान वाढवण्यास मदत होईल.

Realize Your Dreams - तुम्ही तुमचे ध्येय व स्वप्ने निश्चित करा व ती स्वप्ने कृतीत उतरवा म्हणजे एक यशस्वी करिअर घडवण्यास मदत होईल.

 
मागील बातमी
 
पुढची बातमी
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
9 + 8

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment