जाहिरात
 
 
 

प्रवेश परीक्षांच्या गर्दीत CMAT

 
Source: वरद लघाटे   |   Last Updated 05:51(22/02/12)
 
 
 

एमबीए प्रवेश परीक्षांच्या यादीत आता CMAT, या परीक्षांसोबत  CMAT या नव्या परीक्षेचाही समावेश झाला आहे. नोव्हेंबर 2011 मध्ये या परीक्षेची घोषणा करण्यात आली खरी, मात्र तिचे स्वरूप स्पष्ट नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ आणि कुतूहल आहे. यंदा 20 ते 28 फेब्रुवारीदरम्यान  ही परीक्षा देशात सर्वत्र घेतली जाणार असून जवळपास 70 हजार विद्यार्थी या परीक्षेला बसतील, असा अंदाज आहे.

CMATआहे  तरी काय?

भारतात एमबीएसाठी CMAT यांसारख्या अनेक प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. मात्र एमबीए अभ्यासक्रमासाठी संपूर्ण देशात एकच प्रवेश परीक्षा असावी, या हेतूने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) उटअळची घोषणा केली. भारतात व्यवस्थापन अभ्यासक्रम राबवणा-या सरकारी आणि खासगी संस्थांची एकूण संख्या चार हजार आहे. याशिवाय अनेक संस्थांच्या स्वत:च्या वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा असतात. (उदा : सिम्बायोसिसची SNAP,  एनएमची NMAT)  म्हणूनच CMAT च्या गुणांच्या आधारावर एआयसीटीई मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल, असा त्यामागे एआयसीटीईचा उद्देश आहे.

CMAT चा गोंधळ

या प्रवेश परीक्षेची घोषणा होईपर्यंत अन्य संस्थांच्या प्रवेश परीक्षेची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे यंदा कोणत्याही संस्थेवर या परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्याचे बंधन नसेल, असे एआयसीटीईने स्पष्ट केले आहे. याशिवाय आयआयएमसाठी घेतल्या जाणा-या उअळ ला पर्याय नसणार आहे. मात्र पुढील शैक्षणिक वर्षापासून ही परीक्षा देशातील सर्व संस्थांसाठी लागू करण्याचा एआयसीटीईचा मानस आहे.

CMAT चे स्वरूप - या परीक्षेत चार विषयांचा समावेश असून 100 गुणांसाठी एकूण 100 प्रश्न विचारण्यात येणार आहेत.  त्यासाठी  दोन तासांचा अवधी निश्चित केला आहे.

ही परीक्षा संपूर्णत: ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार असून ती बहुपर्यायी असणार आहे. अशा परीक्षांना सीबीटी (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) म्हटले जाते. परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्याने लॉग-इन केल्यावर परीक्षेची वेळ सुरू होते, शिवाय एखादा राहिलेला प्रश्न पुन: सोडवण्याची सोय असते. उटअळ एआयसीटीईच्या निवडक केंद्रांवर जाऊन द्यावी लागणार आहे. तसेच यात नकारात्मक गुणांकन असून चुकलेल्या प्रत्येक उत्तराचा एक गुण वजा केला जाणार आहे.

अधिक माहितीसाठी  www.aicte-cmat.in  ला भेट द्यावी.  CMAT  चा हेल्पलाइन क्रमांक : 022-40369695 किंवा पुढील ई-मेलवर संपर्क साधू शकता. customercare@aicte-cmat.in.

2013 पासून ही परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाणार आहे. त्यामुळे परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना दुस-यांदा परीक्षा देण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागणार नाही.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
2 + 8

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment