जाहिरात
 
 
 

संगणक व इंटरनेट प्रशिक्षण

 
Source: पद्मश्री राव   |   Last Updated 22:37(21/02/12)
 
 
 

परवा माझा मामा म्हणत होता, ‘‘इतकी वर्षे नोकरी केली, हाताने सगळे लिहायचो. आता तो संगणक आलाय. नाकीनऊ आलेत समजता समजता. काही कळत नाही. तुम्हा मुलांचं बरं आहे, शाळेपासून शिकवलं जातं. स्वत: येतं. आमच्यासारख्या जुन्या पिढीला समजणं कठीण....’’

आमचे बाबा त्यादिवशी त्रस्त दिसत होते. काय झालं विचारल्यावर म्हणाले, ‘‘हा फोटो कसा सेव्ह करायचा काही कळत नाही. काहीतरी करतोय खरा, पण कुठे जातो समजत नाही..’’

एकदा म्हणाले, ‘‘या फेसबुकवाल्यांना काही कामधंदा नाही का? सारखे लोक ऑनलाइन असतात?’’

हे वाचून अनेक मोठी मंडळी गालातल्या गालात हसत असतील. तुमचाही अनुभव काही वेगळा नाही. मुळात इंटरनेट व संगणक ही काळाची गरज ओळखून-समजून व शिकून घेणे यात काही विशेष अडचण नाही. आपल्या नातवाला इंटरनेट वापरता येतो व आपल्याला त्यातला ओ की ठो कळत नाही, असा न्यूनगंड मनातून काढून टाका..

त्यासाठी नवीन पिढीने संगणक व इंटरनेटचे प्रशिक्षण केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. आपल्याच एरियामधले आजी आजोबा, काका, काकू, सरकारी नोकरीत असलेले, ज्यांना संगणकीय ज्ञान व इंटरनेट कसे वापरावे, त्यातील खाचखळगे काय आहेत हे समजावणे व शिकवणे याचेही वर्ग सुरू करू शकतो. अल्पदरात आपले कॉलेज आणि नोकरी सांभाळूनसुद्धा तुम्ही हा छोटेखानी पण महत्त्वपूर्ण व्यवसाय सुरू करू शकता.

यात भांडवल म्हणजे तुमच्या घरी असणारे संगणक आणि इंटरनेट कनेक्शन किंवा जर भाड्याने जागा घेतली असली तर तिथे ही सोय.

एक-दोन करत अनेक विद्यार्थी तुम्हाला लाभतील. फक्त मोठी मंडळीच नाहीत, तर गृहोउद्योग चालवणा-या महिला, त्यांना त्यांच्या उत्पादनांची माहिती इंटरनेटवर कशी टाकायची यासारख्या मार्केटिंगच्या अनेक बाबी आपण शिकवू शकतो. त्याचप्रमाणे शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी, गावातल्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगले मागदर्शक तुम्ही होऊ शकता. यासाठी तुम्हाला संगणकाचा वापर, त्याची माहिती व महती असणे गरजेचे आहे.

पण हे करताना तुमच्याकडे एक महत्त्वाची गोष्ट असण्याची गरज आहे ती म्हणजे संयमाची. कारण जी मंडळी तुमच्याकडे शिकायला येणारेत त्यांचा संगणकाशी कसलाही संबंध आलेला नसणार आहे. त्यांच्या मनात या तंत्रज्ञानाविषयी भीती असते.  अगदी लहान मुलाला जसे समजवावे तसे त्यांना समजवावे लागते. तेव्हा आपला संयम खूप महत्त्वाचा आहे. अर्थात तुम्ही जर खुशमिजाज असाल तर हा व्यवसाय उत्तमरीत्या वाढवू शकता....

 
मागील बातमी
 
पुढची बातमी
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
8 + 3

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment