जाहिरात
 
 

रेसिपी - खुसखुशीत शंकरपाळे

 
Source: दिव्य मराठी   |   Last Updated 22:32(16/02/12)
 
 
 
 
 

खुसखुशीत शंकरपाळे

साहित्य
- प्रत्येकी 1 वाटी साखर, तूप, दूध, चिमूटभर मीठ, 1/2 किलो   मैदा.

कृती - कढईत तूप गरम करा. त्यात दूध आणि साखर घालून विरघळून घ्या. त्यात मावेल इतका मैदा घालून पीठ मळा. पिठाची हलक्या हाताने मोठी पोळी लाटून घ्या. शंकरपाळे कापा. तांबूस रंगावर तळा. हे शंकरपाळे अगदी खुसखुशीत होतात.

मकाणा काजू रबडी

साहित्य - दूध अर्धा लिटर, मकाणे एक वाटी, काजू 100 ग्रॅम, वेलदोडा पावडर 1 चमचा, केशर, बदाम, पिस्ता, काजू, साजूक तूप, साखर 1/2 वाटी.

कृती - प्रथम मकाणे साजूक तुपात भाजून त्याची मिक्सरमध्ये पूड करून घ्या. नंतर दूध आटवून त्यात साखर घाला. दूध पुन्हा थोडे आटवून घ्या. नंतर त्यात काजू पूड, मकाणे पूड टाकून पुन्हा थोडे आटवल्यानंतर त्यात वेलची पूड, केशर इत्यादी घाला. घट्ट रबडी करा. गॅसवरून उतरवल्यानंतर त्यात पिस्ता, बदाम, काजू यांचे काप घाला.

बीट व कोथिंबीर सॅलड

साहित्य - 4 वाफवलेले बीट, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, काळे मीठ, मीरपूड, साखर, लिंबू रस/ व्हिनेगर.

कृती - वाफवलेल्या बीटचे छोटे तुकडे करा. त्यावर मीठ, लिंबू रस, साखर, काळे मीठ टाकून भरपूर कोथिंबीर पेरा. आवडत असेल तर दीड चमचा घट्ट दही यावर घालू शकता. शक्यतो थंड सर्व्ह करा.

चटणी सँडविच

साहित्य

बे्रड, चीज/पनीर हवे असल्यास, बटर, टोमॅटो, काकडी, ढोबळी मिरची, स्वीट कॉर्नचे दाणे, चिरलेला पालक, उकडलेला बटाटा, बारीक चिरलेला कोबी, बीट यांपैकी घरात असतील त्या भाज्या. चटणीसाठी शेंगदाण्याचे कूट वा मूठभर भिजवलेले शेंगदाणे, मिरच्या, कोथिंबीर, लिंबाचा रस, जिरं, मीठ.

कूट वा तासभर भिजवलेले दाणे, धुऊन चिरलेली कोथिंबीर, आवडीनुसार मिरच्या, थोडं जिरं आणि चवीपुरतं लिंबू आणि मीठ वाटून सरसरीत चटणी वाटून घ्यावी.  बे्रडच्या एका स्लाइसला बटर लावावे. दुस-या स्लाइसला चटणी लावावी.

चटणी लावलेल्या स्लाइसवर घरात असतील त्या भाज्या बारीक चिरून/पातळ चकत्या करून ठेवाव्या. आवडत असल्यास चीज वा पनीर घालावे. त्यातून भरपूर प्रथिने मिळतात. बटर लावलेला स्लाइस वर ठेवून दोन्ही बाजूंना बाहेरून बटर लावून इलेक्ट्रिक वा साध्या टोस्टरवर टोस्ट करावा.

या चटणीची चव नेहमीच्या कोथिंबीर, पुदिन्याच्या चटणीपेक्षा वेगळी लागते.

बटाट्याची शेव

साहित्य - बटाटे, लाल तिखट, मीठ, जि-याची पूड, थोडे राजगि-याचे पीठ, तळण्यासाठी तूप.

कृती - पिठूळ बटाटे घेऊन ते वाफवून पुरणयंत्रातून अगदी बारीक वाटून घ्या. या बटाट्याच्या गोळ्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ व जि-याची पूड व थोडे राजगि-याचे पीठ घाला. थोडासा खाण्याचा पिवळा रंग घालावा व गोळा चांगला मळून शेवपात्राने शेव तुपात तळून काढा.

 
 
मागील बातमी
 
पुढची बातमी
 
 
 
 
 
 
 
 
 
आपके विचार

नहीं दिखाया जायेगा

दिखाया जायेगा

दिखाया जायेगा

कोड :
7 + 7

 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment