जाहिरात
 
 
 

मासिक समस्या

 
Source: डॉ. अंजली बापट   |   Last Updated 00:51(17/02/12)
 
 
 

मुलगी वयात आल्यावर म्हणजे साधारण 10 वर्षांपासून 50व्या वर्षापर्यंत बहुतेक स्त्रियांना नियमित मासिक पाळी येते; परंतु साधारण 20-25% स्त्रियांना कधी ना कधी मासिक पाळीच्या वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. असे त्रास कटकटीचे असतातच व समजा दुर्लक्ष झाले तर आरोग्यासही धोका होऊ शकतो. मानसिक चिंता तर वाढतेच. म्हणूनच हे त्रास कोणत्या प्रकारचे असतात त्याविषयी थोडी माहिती. लहान वयात- मासिक पाळी सुरू होण्याच्या वेळी संभवणारे त्रास मासिक पाळी खूप लवकर सुरू होणे.

जर 10 वर्षे पूर्ण होण्याआधी मुलीला पाळी सुरू झाली तर त्याला प्रिकॉशिअस प्युबर्टी असे म्हणतात. हायपोथेलेमो-पिट्युटरी-ओव्हरियन अ‍ॅक्सिसमधील दोषामुळे म्हणजेच शरीरातील हार्मोन्सच्या पातळीत गडबड झाल्याने हे होऊ शकते. तसेच थायरॉइड, अ‍ॅड्रेनल या ग्रंथींचे कार्य नीट नसल्यास हा त्रास होतो. विशिष्ट प्रकारच्या अंडकोषाच्या ट्यूमर्समुळेही ही समस्या उद्भवते. पाळी सुरू झाल्यावर उंची वाढायची थांबू शकते किंवा उंची जास्त वाढत नाही. तसेच वय कमी असल्याने मानसिक चिंता जास्त वाढू शकते. वैद्यकीय तपास करून कोणताही मोठा रोग नाही ना याची खात्री करून घेणे योग्य.

मासिक पाळी उशिरा सुरू होणे/ अजिबात सुरू न होणे.

वयाच्या 18व्या वर्षापर्यंत पाळी सुरू झाली नाही तर कोणता दोष नाही ना, हे तपासणे गरजेचे असते. अशा बहुतांश मुलींमध्ये गुणसूत्रातील दोष किंवा जन्मत:च असलेल्या गर्भाशयाच्या दोषामुळे पाळी येत नाही. जर जन्मत: दोष असेल तर उपाय करूनही फायदा होत नाही. पाळी सुरू झाल्यानंतरच्या सुरुवातीला जास्त रक्तस्राव होणे. (प्युबर्टी मेनोरॅजिया)

या समस्येचे प्रमाण खूप जास्त आहे. अनेक लहान मुलींना सुरुवातीच्या काही वर्षांत प्रमाणापेक्षा खूप जास्त रक्तस्राव होतो. शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित पातळीमुळे   हे होते. यावर वेळीच इलाज केला नाही तर रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होऊन आरोग्य धोक्यात येऊ शकते. (अ‍ॅनेमिया) पाळी सुरुवातीला अनियमित असणे.

शरीरातील ग्रंथींचे काम परिपक्व पद्धतीने नसल्यामुळे सुरुवातीच्या 3-4 वर्षांपर्यंत पाळी अनियमित असू शकते. थोडा धीर धरणे योग्य ठरते. अर्थात मोठा दोष नसल्याची खात्री केल्यानंतरच.

पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज - बीजकोषात दर महिन्यातून एकदा एकच बीज परिपक्व होते व बाहेर पडते. काही स्त्रियांमध्ये अनेक बीजे वाढायला लागतात; पण त्यांपैकी कोणतेही एक बीज परिपक्व होऊ शकत नाही व बीजकोषातून बाहेर पडत नाही. (अ‍ॅनोव्हुलेशन) यामुळे मासिक पाळी अत्यंत अनियमित येते. कधी कधी 3-4 महिन्यांतून एकदाच पाळी येते. याबरोबरच वजन खूप वाढणे, शरीरावरील केसांची वाढ होणे, चेह-यावर खूप लव येणे, तारुण्यपीटिका येणे अशी लक्षणे दिसतात. मासिक पाळी जरी अनियमित असली तरीही जर हे निदान झाल्यावर इतर आरोग्यावर फारसे दुष्परिणाम होत नाहीत. जास्त प्रमाणात व नियमित व्यायामाने वजन कमी केल्यास व योगासने केल्यास खूपच फायदा होऊ शकतो. अविवाहित मुलींमध्ये जरी हा दोष असला तरी फारशी काळजी करण्याचे कारण नाही; परंतु विवाहानंतर गर्भधारणेच्या वेळी मात्र योग्य उपाययोजनांची गरज निर्माण होऊ शकते.

दुर्दैवाने अनेक रुग्ण पाळी नियमित करण्यासाठी वर्षानुवर्षे गर्भनिरोधक गोळ्या घेताना आढळतात; परंतु अशा गोळ्या लहान वयापासून खूप वर्षे घेतल्याने इतर समस्या उद्भवू शकतात. मधल्या वयामध्ये तसेच चाळिशीनंतर पाळीच्या समस्यांचे पुढील काही प्रकार आढळतात - पाळीच्या वेळी खूप जास्त रक्तस्राव होणे, पाळी कमी अंतराने जास्त वेळा येणे, पाळी उशिरा येणे किंवा खूप कमी रक्तस्राव कमी दिवस होणे, पाळी तीन महिन्यांपेक्षा कमी वेळा येणे. सोनोग्राफी किंवा इतर चाचण्या केल्यानंतर फायब्रॉइड/ओव्हरियन ट्यूमर इ. नसल्यास औषधयोजनेने हा त्रास कमी होऊ शकतो. मात्र, 4-6 महिने औषधे घेऊनही जर त्रास कमी झाला नाही तर मात्र शस्त्रक्रियेची गरज लागू शकते. स्त्रीच्या वयानुसार कोणत्या प्रकारची शस्त्रक्रिया/कधी करायची हे ठरवावे लागत.

 
मागील बातमी
 
पुढची बातमी
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
1 + 8

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment