चिपळूण साहित्य संमेलानाची नियोजित ग्रंथदिंडी रद्द

चिपळूण - येथे होत असलेल्या ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी रद्द करण्याचा निर्णय संयोजन समितीने घेतला आहे. मुस्लिम साहित्यिक हमिद दलावईंच्या घरातून निघणा-या दिंडीला मुस्लिम समाजाच्या संघटनांनी केलेल्या विरोधापुढे नमते घेत संयोजन समितीने साहित्य संमेलनाच्या उदघाटनाआधी निघणारी ग्रंथदिंडी रद्द केली आहे.
मुस्लिम लेखकाच्या सन्मानास मुस्लिम समाजाचाच विरोध होत असल्यामुळे विरोध करणा-यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी साहित्यीक वर्तूळातून केली जात आहे.
साहित्य संमेलन संयोजन समितीने आता ग्रंथदिंडीऐवजी मिरजोळीतून पर्यावरण दिंडी काढण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
दलवाईंच्या साहित्यातून मुस्लिम सामाजाचे विद्रूपीकरण झाल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला आहे. मुख्य प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देण्यासही मुस्लिम संघटननेने विरोध केला आहे.






