Home >> Maharashtra >> Kokan >> Ratnagiri >> Complicated Accident On Goa Mumbai Highway Near Ratnagiri
रत्नागिरीजवळ झालेल्या विचित्र अपघातात पाच जण ठार
प्रतिनिधी
| Jan 02, 2012, 03:53AM IST

रत्नागिरी: गोवा- मुंबई हायवेवर भरधाव वेगाने जाणारा कंटेनर झाडावर आदळून नंतर चार गाड्यांना चिरडत झालेल्या विचित्र अपघातात पाच जण ठार झाल्याची घटना रविवारी घडली. हा अपघात हातखंबा- निवळी रस्त्यावर घडला. ठार झालेल्या पाचपैकी दोघांची ओळख पटली आहे.
कृष्णा अनंत केदारे (60) आणि संतोष गोपाळ शिंदे (44) अशी दोन मृतांची नावे आहेत. तर अन्य तिघांची नावे कळू शकले नाहीत.याशिवाय पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यातील चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. जखमी झालेले हे सुझलॉन कंपनीचे कर्मचारी असून ते पाटणमार्ग मालेश्वर- गणपतीपुळे यात्रेसाठी जात होते.
या अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला असून रात्री उशिरा वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात




