जाहिरात
 
 
 

राष्‍ट्रवादी कॉग्रेसच्‍या रॅलीत विजेच्‍या धक्‍क्‍याने 4 कार्यकर्त्‍यांचा मृत्‍यू

 
Source: दिव्‍य मराठी वेब टीम   |   Last Updated 12:47(12/02/12)
 
 
 

ठाणेः कळव्यात वीजेचा शॉक लागून राष्ट्रवादी काँग्रेसचे चार कार्यकर्ते ठार झाले आहेत. राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार महेश साळवी यांची प्रचार रॅली होती. लोखंडी रॉडवर झेंडा लावून कार्यकर्ते जात असताना वीजेचा धक्का लागला. या घटनेत 8 जण जखमी झाले असून त्‍यापैकी दोघांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. हे सर्व कार्यकर्ते शिवाजीनगर भागातील आहेत. सर्वजण तरुण कार्यकर्ते असून त्‍यांचे वय सुमारे 20 ते 25 वर्षे आहे. मृतकांच्‍या कुटुंबियांचे सांत्‍वन करण्‍यासाठी ठाण्‍यातील राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रुग्‍णालयात उपस्थित असून कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्‍याचे आश्‍वासन त्‍यांनी दिले.

महेश साळवी यांची कळव्‍यात शिवाजीनगर भागातच प्रचार रॅली होती. एका कार्यकर्त्‍याच्‍या हातात लोखंडी रॉडला लावलेला झेंडा होता. रॅलीच्‍या उत्‍साहात या कार्यकर्त्‍याने झेंडा उंचावला. परंतु, वीजेच्‍या तारेला रॉडचा स्‍पर्ष झाला आणि तो चिपकला. त्‍याला वाचविण्‍यासाठी इतर कार्यकर्ते सरसावले. पंरतु, तेही चिपकले. ऐनवेळी झालेल्‍या या प्रकारामुळे रॅलीत सहभागी असलेले सर्वजण गोंधळात पडले. वीजेच्‍या तारेला चिपकलेल्‍यांना कसे वाचवावे, हे कोणाला कळाले नाही. अखेर त्‍यापैकी चौघांचा मृत्‍यू झाला. अशोक राजपूत, प्रदिप गुप्‍ता, अण्‍णा राजपूत अशी तिघांची नावे कळाली आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
7 + 7

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment