Home » Maharashtra » Kokan » Thane » Good Train Engine Pentagraph Break At Thane Railway Station

मालगाडीच्या इंजिनचा पेंटाग्राफ दुरुस्त; मध्य रेल्वे ट्रॅकवर

दिव्य मराठी वेब टीम | Jan 07, 2013, 17:52PM IST
मालगाडीच्या इंजिनचा पेंटाग्राफ दुरुस्त; मध्य रेल्वे ट्रॅकवर

ठाणे- ठाणे रेल्वे स्थानकावर मालगाडीचा तुडलेला पेंटाग्राफ दुरुस्त झाल्यानंतर दोन्ही बाजूंची वाहतूक सुरु करण्यात आली आहे. अप आणि डाऊनच्या गाड्या हळूहळू मार्गस्थ झाल्या आहे. लोकलही सुरु झाल्या असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, सोमवारी ठाणे स्थानकावर मालगाडीच्या इंजिनचा पेंटाग्राफ तुटल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा खोळंबली होती: त्यांचा फटका मात्र एक्स्प्रेस गाड्यांसह लोकल गाड्यांनाही बसला होता.

ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सातवर मालगाडीच्या इंजिनच्या पेंटाग्राफ तुटला. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. फास्ट ट्रॅकवरील अप आणि डाऊनची वाहतूक खोळंबली होती. मध्य रेल्वेच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

वाहतूक खोळंबल्यामुळे नेत्रावती, कामायनी आणि पवन एक्स्प्रेससह अनेक एक्स्प्रेस गाड्या तब्बल दीड तास उशीरानी धावत आहेत.

Email Print
0
Comment