ठाणे- ठाणे महानगरपालिकेच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. ठाण्यातील सर्व निकाल जाहीर झाले आहेत. महायतीला स्पष्ट बहुमत मिळालेले नाहीच. तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचेही स्वप्न भंगल्यातच जमा आहे. सेनेने 52, रिपाइंला 1 आणि भाजपने 9 अशा एकूण 61 जागा महायुतीने जिंकल्या आहेत. महायुतीला सत्तेसाठी 66 हा जादुई आकडा गाठण्यासाठी 5 जागांची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने 34, कॉंग्रेसने 18, मनसेने 7 तर बहुजन समाजवादी पार्टीने 2 जागा जिंकल्या आहेत. तर 8 ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे महायुतीलाच पुन्हा सत्तेची संधी निर्माण झाली ओ. विकासापेक्षा पक्षफोडीच्या कारणामुळे गाजलेल्या या निवडणुकीत 130 जागांसाठी गुरूवारी 52 टक्के मतदान झाले. राज्यात सर्वात प्रथम ठाणे महानगरपालिकेची मतमोजणी सकाळी साडे सात वाजता सुरू झाली.
ठाण्यामध्ये महायुती आणि आघाडी यांच्यामध्ये काटयाची लढत सुरू असून सत्ता मिळवण्यासाठी दोघांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पुढच्या निकालावर सत्ता कोणाची येईल हे ठरेल. सत्ता स्थापन करण्यासाठी मनसेची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत डेरेदाखल झालेले सुभाष भोईर यांचा हिरा पाटील यांनी पराभव केला. सेनेला हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते. भोईर यांच्याकडे संभाव्य महापौर पदाचे उमेदवार म्हणून पाहिले जात होते.
विद्यमान महापौर अशोक वैती यांच्या रूपाने सेनेने ठाण्यातील आपले खाते उघडले.
प्रभाग क्रमांक 46 अ आणि ब मधून मुकूंद केणी - प्रमिला केणी आणि प्रभाग क्रमांक 45 अ आणि ब मधून मुकुंद पाटील आणि मनाली पाटील या दांम्पत्यांनी विजय मिळवला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना-भाजप-रिपाई महायुती यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
विजयी उमेदवार आणि प्रभाग क्रमांक
प्रभाग क्र-2 संजय मोरे (शिवसेना)
प्रभाग क्र-43 ब मधून मनोहर साळवी (राष्ट्रवादी)
तत्पूर्वी, मतमोजणीस सुरूवात झाल्यानंतर वॉर्ड क्रमांक एकच्या राष्ट्रवादीच्या मनिषा पाटील यांनी प्रतिनिधी नसल्यामुळे आक्षेप नोंदवला. त्यामुळे थोडावेळ तिथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाला होता.
पक्ष विजय
शिवसेना 51
भाजप 09
कॉंग्रेस 08
राष्ट्रवादी कॉंग्रेस 34
मनसे 07
रिपाइं 01
बसपा 02
इतर 08
एकूण 130
प्रभागनिहाय निकाल पुढीलप्रमाणे
३१ अ संगीता पाटील (शिवसेना)
३१ ब काशीराम राऊत (शिवसेना)
-------------------
४६ अ- कळवा प्रमिला केणी
४६ ब मुकुंद केणी
----------------
४५ अ मनाली पाटील
४५ ब मिलिंद पाटील
-----------------
४३ अ- अपर्णा साळवी - सून
४३ ब- मनोहर साळवी - सासरे
-------------------
२ अ बिंदू मढवी (शिवसेना)
२ ब संजय मोरे (शिवसेना)
------------------
२१ ब उमेश पाटील (शिवसेना)
२१ अ अनिता गौरी (शिवसेना)
-------------------
१६ अ परिषा सरनाईक (शिवसेना)
१६ ब विहंग सरनाईक (शिवसेना)
-------------------
२२ अ सुवर्णा शिर्के (शिवसेना)
२२ ब सुहास देसाई (राष्ट्रवादी)
-------------------
२० अ राजेंद्र सापते (शिवसेना)
२० ब विजया तासे (शिवसेना)
-------------------
४१ अ महेश वाघ (शिवसेना)
४१ ब पूजा वाघ (शिवसेना)
-------------------
६५ अ शैलेश पाटील (मनसे)
६५ ब सुनिता मुंडे (मनसे)
-------------------
३५ अ अश्विनी जगताप (शिवसेना)
३५ ब संजय मोरे (शिवसेना)
-------------------
८ अ तेजस्विनी चव्हाण (मनसे)
८ ब सुधाकर चव्हाण (मनसे)
-------------------
३९ अ रुचिता मोरे (मनसे)
३९ ब नारायण पवार (काँग्रेस)
-------------------
३ अ गणेश टाक (मनसे)
३ ब चेतना पाटील (मनसे)
-------------------
४९ अ ऊर्मिला डोंगरे (मनसे)
४९ ब संजय वागुले (भाजप)
-------------------
१५ अ वर्षा पाटील (भाजप)
१५ ब दशरथ पलांडे (शिवसेना)
-------------------
६१ अ रौफ खान (राष्ट्रवादी)
६१ ब हाफिजा नाईक (राष्ट्रवादी)
-------------------
३० अ माप्रित शान (काँग्रेस)
३० ब मनोज शिंदे (काँग्रेस)
-------------------
२२ अ रत्नप्रभा पाटील (मनसे)
२२ ब सुहास देसाई (राष्ट्रवादी)
-------------------
२३ अ महेश्वरी तरे (शिवसेना)
२३ ब मिलिंद पाटणकर (भाजप)
-------------------
४२ अ नजीब सुलेमान (राष्ट्रवादी)
४२ ब वहिदा मुस्तफा (राष्ट्रवादी)
-------------------
२१ अ राजेंद्र वागस्कर (मनसे)
२१ ब विनिता वागस्कर (मनसे)
-------------------
१५ अ वर्षा पाटील (भाजप)
१५ ब दशरथ पालांडे (शिवसेना)
-------------------
१८ अ आशा जयस्वाल (अपक्ष)
१८ ब संजय पांडे (अपक्ष)
-------------------
२८ अ रामभाऊ तायडे (रिपाई)
२८ ब एकता भोईर (शिवसेना)
-------------------
५९ अ राजा किणे (काँग्रेस)
५९ अ शकीला कुरेशी (काँग्रेस)
-------------------
५७ अ अनिता किणे (काँग्रेस)
५७ ब शिवदास भगत (राष्ट्रवादी)
-------------------
२९ अ आशा कांबळे (अपक्ष)
२९ ब जितेंद्र वाघ (शिवसेना)
तुमचे विचार(2)