जाहिरात
 
 
 

बीड जिल्ह्यात एकाच दिवशी 31 रेस्टिकेट

 
Source: प्रतिनिधी   |   Last Updated 01:26(23/02/12)
 
 
 
विज्ञापन

बीड - इंग्रजीच्या पेपरला पहिल्याच दिवशी कॉपी करणारे अठरा विद्यार्थी रस्टिकेट करण्याची कारवाई थांबत नाही तोच दुस-या दिवशी हिंदीच्या पेपरला जिल्ह्यात कॉपीविरोधी भरारी पथकाने 31 विद्यार्थ्यांना रस्टिकेट केले असून, यामध्ये सर्वाधिक केज तालुक्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

बुधवारी जिल्हा परिषदचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एस. के. पवार यांच्या भरारी पथकातील उपशिक्षणाधिकारी देवीदास बोरसे, शिक्षण विस्तार अधिकारी धनंजय शिंदे यांच्या पथकाने केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील श्याम विद्यालयाला भेट देऊन या ठिकाणी  कॉपी करणा-या 13, सारणी सांगवी येथील विठ्ठल विद्यालयात 7 विद्यार्थ्यांना रस्टिकेट केले.

महिला पथकाच्या प्रमुख मंगला आगवान यांनी आष्टी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य आणि६६ विज्ञान   महाविद्यालयातील केंद्रात कॉपी करणा-या 4 विद्यार्थ्यांना तर गटशिक्षणाधिकारी वैशाली जामदार, शिक्षण विस्तार अधिकारी

मनोरंजन धस यांच्या पथकाने दोन विद्यार्थ्यांवर कारवाई केली.

धानोरा येथे आनंदराव धोंडे कनिष्ठ महाविद्यालयात  4 विद्यार्थ्यांना रस्टिकेट केले. याच तालुक्यातील भगवान महाविद्यालयात 2 विद्यार्थ्यांना रस्टिकेट करण्यात आले. उपशिक्षणाधिकारी एम. एस. रोटे यांनी गेवराईतील माध्यमिक आश्रमशाळेतील केंद्राला भेट देऊन एका विद्यार्थ्याला रस्टिकेट केले.  जिल्ह्यात एकूण 31 विद्यार्थ्यांना एकाच दिवशी रस्टिकेट करण्यात आले.

तालुका       केंद्र    विद्यार्थी

केज    शाम विद्यालय, दहिफळ    13 

केज    विठ्ठल विद्यालय, सारणी    07 

आष्टी    आष्टी कला महाविद्यालय    04 

आष्टी    आनंदराव धोंडे, धानोरा    04 

आष्टी    भगवान महाविद्यालय    02 

गेवराई    आश्रमशाळा विद्यालय    01

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
7 + 6

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment