बीडमध्ये वाचनालयातच चालतो कुंटणखाना; 5 जण अटकेत

बीड- शहरातील भरवस्तीत एका सार्वजनिक वाचनालयामध्ये खुलेआम सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकून पाच जणांना अटक करण्यात आली.
पोलिस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिस उपअधीक्षक राजू भुजबळ यांच्या पथकाने रविवारी सायंकाळी पिंगळेनगर भागात ही कारवाई केली. मुक्ताई सार्वजनिक वाचनालयात एक बनावट ग्राहक पाठवून इतर पोलिस दबा धरून बसले. सायंकाळी छापा मारला. वाचनालयाची पाटी असलेल्या इमारतीच्या खोल्यांमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता. यात एक तरुणी, तीन महिला, एक आंटी अशा पाच जणांना पोलिसांनी अटक केली. छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकात प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक विशाखा धुळे, नितीन साळवे, विशाल वडमारे, संतोष कसाब, विजय जाधव, विद्या चौरे, विद्या सौंदरमल यांचा समावेश होता.
इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारी मुलगी !
वाचनालयात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकला असता इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करणा-या एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. वाचनालयाची पाटी असलेल्या इमारतीच्या खोल्यांमध्ये पुस्तके नव्हती. शिक्षणाच्या नावाखाली आई-वडिलांना अशा पद्धतीने धोक्यात टाकू नये.
राजू भुजबळ, प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक




