औरंगाबाद - अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी विविध सभा, संमेलने, व्याख्याने तसेच वर्तमानपत्रांत मांडलेल्या विचारांचे पुस्तकरूपाने संकलन करून ‘विचार चळवळीचे, बाळासाहेब आंबेडकरांचे’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच राजा ढाले यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी ढाले म्हणाले की, आंबेडकरी चळवळीत कार्य करणा-या कार्यकर्त्यांच्या विचारांचे संकलन करून ते मुद्रित रूपाने लोकांसमोर आणणे हे ऐतिहासिक कार्य आहे. कवी देवानंद पवार म्हणाले की, औरंगाबाद हे आंबेडकरी चळवळीचे ऊर्जाकेंद्र आहे. या वेळी आनंद चक्रनारायण, संपादक रत्नाकर खंडागळे, प्रा. भारत सिरसाट, डॉ. वाल्मीक सरोदेंची उपस्थिती होती.