सावन के महीने में.. आई बहार

औरंगाबाद - रंगार गल्ली येथील महेश भवनात माहेश्वरी समाजाच्या चिरमी महोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. यात महिलांनी ‘गोरी हतेली पर मेहंदी रंग लाई, सावन के महीने में तीज त्योहार की बहार आई’ या तसेच इतर पारंपरिक गाणी गाऊन शंकर-पार्वतीची आराधना केली. या महोत्सवात 40 महिलांनी सहभाग नोंदवला.
50 वर्षांपासून शहरात माहेश्वरी समाजाच्या वतीने चिरमी महोत्सव साजरा केला जातो. यंदा माहेश्वरी किशोरी मंडळाच्या हर्षासोनी (वैजापूर), सीमा मुंदडा (गंगापूर), सपना चांडक (औरंगाबाद) यांनी महोत्सवाचे आयोजन केले आहे. 27 तारखेपर्यंत चालणार्या महोत्सवात विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यानिमित्ताने महिला एकत्र येतात, विचारांची आणि विविध कलागुणांची देवाणघेवाण करतात.
26 जुलै
किचन क्विन स्पर्धा- गोड, नमकीन पदार्थ बनवणे, वेशभूषा करणे.
हँडमेड ग्रीटिंग आणि राखी- हाताने बनवलेल्या ग्रीटिंग आणि राखीची निर्मिती करणे.
दागिण्यांची निर्मिती- विविध भाज्यांपासून दागिन्यांची निर्मिती करणे.
27 जुलै
मेंदी स्पर्धा- गोपाळकृष्ण या संकल्पनेवर आधारित मेंदी काढली जाईल.
मेंदी स्पर्धा- बाजूबंद आणि हातफूल मेंदीतून साकारणे.
बेस्ट मे बेस्ट- विविध पाककृती बनवणे, सजावट.
असे आहे महत्त्व
याचे पारंपरिक महत्त्व म्हणजे मारवाडी पुरुष पूर्वी व्यवसायाच्या निमित्ताने बराच काळ घरापासून दूर राहत असत. र्शावण महिन्यात ते घरी परतायचे. या वेळी महिला हातावर मेंदी आणि पारंपरिक वेशभूषा करून गीत-गुंजनाने पुरुषांचे स्वागत करीत असत. मोठी तीज आणि छोट्या तीजदरम्यान हा महोत्सव चिरमी नावाने साजरा करण्यात येतो. या वेळी विविध खेळही खेळले जात होते.





