जाहिरात
 
 
 

पीईएस अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने तयार केली सायकल बाइक

 
Source: योगेश वाघमारे . 9579041257   |   Last Updated 07:16(23/02/12)
 
 
 

पीईएस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणार्‍या या विद्यार्थ्याचे नाव आहे अफरोज शेख मुश्ताक आहे. रोशन गेट येथे राहणार्‍या अफरोजला शाळेत असल्यापासून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची त्याची हौस होती. त्यामुळे तो शाळेतही अभ्यास करताना आपल्याच विश्वात रमत असे. काही दिवसांपूर्वी त्याने पेट्रोलवर धावणारी सायकल तयार केली होती. आता त्याने लहान मुलांची सायकल घेऊन सोलार बाइक तयार केली आहे. या बाइकला तो ‘मिनी सोलार बाइक’ असे म्हणतो. सायकलचे पॅडल काढून तेथे अफरोजने 24 पॉवरची डीसी मोटर बसवली. शिवाय 12 व्होल्टच्या दोन बॅटरीही बसवल्या असून त्या 24 पॉवर डीसी मोटरला जोडल्या आहेत. सायकलच्या पाठीमागे सौर ऊर्जेचे 12 व्होल्टचे पॅनल बसवले आहे.

दोन बॅटरींचा उपयोग

या बाइकला दोन बॅटरी बसवल्या आहेत. एक बॅटरी सौर ऊर्जेवर तर दुसरी बॅटरी वीजेवर चार्ज होते. ही बाईक बॅटरीवर एकदा चार्ज केल्यावर 12 किलोमीटर अंतर धावते. जेवढी मोठी बॅटरी तितके जास्त अंतर पार करण्याची क्षमता या बाइकमध्ये आहे. उन्हात पार्क केल्यावर सौर ऊर्जेमुळे बाईकमधील बॅटरी चार्ज होत राहते. बाइकची स्पीडही प्रतितास 30 किलोमीटर एवढी असून ती 80 किलो वजन घेऊन धावू शकते.

खास लाकडी बॉडीचा वापर

अफरोज याने सायकलला लाकडी बॉडी बसवली आहे. शॉक लागू नये म्हणूनच त्याने ही शक्कल लढवली. एवढे करूनही या बाइकचे वजन कमी ठेवण्यात त्याला यश आले आहे. ही बाइक तयार करण्यासाठी त्याला जवळपास 8 ते 9 हजार रुपये खर्च आला.

बाइकची रचना आणि फायदे

या बाइकमधील बॅटरीचा वापर करून 2 तास घरातील विद्युत उपकरणे चालवली जाऊ शकतात, तर तासभर संगणक चालू शकतो. या गाडीला रिव्हर्स, फॉरवर्ड असे स्वीच बसवण्यात आले आहेत. फॉरवर्ड स्वीच ऑन केल्यास बॅटरीपासून मोटरला विद्युत प्रवाह मिळतो आणि बाइक धावू लागते. रिव्हर्स स्वीच ऑन केल्यास इन्व्हर्टरला सप्लाय मिळतो. त्यामुळे घरातील विद्युत उपकरणे सुरू करता येतात.

या बाइकसाठी मिळाले मोलाचे मार्गदर्शन:

या बाइकसाठी मला माझ्या पीईएस कॉलेजच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटचे प्रमुख प्रा. जाधव सर, तसेच प्रा. विशाल कदम सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तसेच अशा कामासाठी माझ्या घरातलेही सदैव माझ्या पाठीशी असतात. तेच मला प्रोत्साहनही देतात.

-अफरोज शेख मुश्ताक

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
7 + 9

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment