Home » Maharashtra » Marathwada » Other Marathwada » Birsa Munda Jayanti, Kinwat

बिरसा मुंडा जयंती : पारंपरिक नृत्याने साजरी

प्रतिनिधी | Dec 01, 2011, 01:42AM IST
बिरसा मुंडा जयंती : पारंपरिक नृत्याने साजरी

नांदेड - किनवट तालुक्यातील आदिवासी समाजाने क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती मंगळवारी पारंपरिक नृत्याने साजरी केली. आदिवासी समाज दरवर्षी 29 नोव्हेंबरला बिरसा मुंडा जयंती साजरी करतो.  

 झारखंड राज्यात रांचीच्या ऊलीहातू गावात सुगना मुंडा व करमी हातू यांच्यापोटी 15 नोव्हेंबर 1875 रोजी बिरसा मुंडा यांचा जन्म झाला. इंग्रजी शाळेत शिक्षण घेतलेल्या बिरसा यांना आदिवासी समाजाबद्दल आपुलकी होती. इंग्रज आपल्या समाजावर अन्याय करीत आहेत, अशी त्यांची भावना होती. त्यातून त्यांनी आदिवासी समाजातील लढवय्या युवकांना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. 1897 ते 1900 या काळात इंग्रज सैनिक व आदिवासी यांच्यात युद्ध झाले. त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांच्याकडे होते. आदिवासी बिरसा यास धरती बाबा या नावाने ओळखले जात होते. 3 फेब्रुवारी 1900 रोजी बिरसा व त्यांच्या साथीदारांना अटक झाली. रांची येथील कारागृहात 9 जून 1900 रोजी बिरसा मुंडांचे निधन झाले. तेव्हापासून बिरसा मुंडा यांची जयंती साजरी के ली जाते.

वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
8 + 8

 
 
 
जाहिरात

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment