जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Other Marathwada >> Fir Against Yudhajit Pandit Gevrai Beed

सभापती पंडित यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी | May 17, 2012, 00:09AM IST
 
 


गेवराई  - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शेख मिन्हाज पटेल यांना न्यायालय परिसरात मारहाण केल्याप्रकरणी बीड जि.प.चे कृषी सभापती युधाजित पंडित यांच्यासह 15 जणांविरुद्ध येथील शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शेख मिन्हाज पटेल यांना ‘आरोपींचा जामीन का घेतला, गावापुरते राजकारण कर’ असे म्हणत 10 मे रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास महेश सौंदरमल, मनोज हजारे, फय्याज चाऊस, मधुकर बाबर, चालक हराळेसह 15 जणांनी मारहाण करून त्यांना स्कॉर्पिओ गाडीत टाकून आमदार बदामराव पंडित यांच्या कार्यालयात नेले होते. मिन्हाज यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन, रोख तीन हजार पाचशे रुपये काढून घेऊन त्यांना धमकी देण्यात आली होती, असेही पोलिसांना  दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ा या प्रकरणी मंगळवारी रात्री सभापती पंडित यांच्यासह  इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कवडे करत आहेत.

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
7 + 6

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment