जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Other Marathwada >> Kadaria Mashid Blast Matter Criminal Sold At Jalna

कादरिया मशिदीतील बॉम्बस्फोटातील आरोपी निर्दोष

प्रतिनिधी | Jul 18, 2012, 05:16AM IST
 
 


जालना- जालना शहरातील कादरिया मशिदीत 2004 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सहा आरोपींची जालना जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी निर्दोष मुक्तता केली. आरोपींचा या प्रकरणाशी काहीच संबंध नसून त्यांना विनाकारण गोवण्यात आले, असा निकाल कोर्टाने दिला.

मारुती केशवराव वाघ, योगेश रवींद्रराव देशपांडे, गुरुराज जयराम तुप्तेवार, राहुल मनोहर पांडे, संजय ऊर्फ भाऊराव विठ्ठलराव चौधरी (सर्व रा. नांदेड) आणि राकेश दत्तात्रय धावडे (रा. पुणे) यांची निदरेष मुक्तता झाली. भोकरदन नाका परिसरात असलेल्या कादरिया मशिदीत 27 ऑगस्ट 2004 रोजी दुपारी 1.45 वाजता बॉम्बस्फोट झाला होता. यात सात जण जखमी झाले होते. मशिदीचे पेश इमाम मौलाना सय्यद कौसर हमीद कादरी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सहा जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. यात 28 साक्षीदार तपासण्यात आले. तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एल. गजभिये यांनी सर्व सहा जणांची निदरेष मुक्तता केली. आरोपींच्या वतीने अँड. संजीव देशपांडे, अँड.नितीन रुणवाल, अँड.विपुल देशपांडे, अँड.बाबासाहेब इंगळे, संदीप घुगे यांनी काम पाहिले.

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
5 + 8

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment