Home » Maharashtra » Mumbai » Anti Corruption Department Officer To Action On Octorai In Mumbai

मुंबईतील जकात नाक्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे छापे

दिव्य मराठी वेब टीम | May 15, 2012, 21:43PM IST
मुंबईतील जकात नाक्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे छापे

मुंबई: मुंबईतल्या काही जकात नाक्यांवर मंगळवारी‍ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी एकाच वेळेस छापे टाकले. त्यात दहीसर, वाशी, मुलूंड आणि शिवडी या चार जकात नाक्यांचा समावेश आहे. या नाक्यांवर काही बेकायदेशीर बाबीही निदर्शनास आल्या आहेत. गैरव्यवहार करणार्‍या अनेक कर्मचार्‍यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना जकात दक्षता विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.

Email Print
0
Comment