जाहिरात
 
 
 

45 वर्षांपासून एकाच कुटुंबाकडे नगरसेवकपद

 
Source: गीता देसाई   |   Last Updated 01:35(23/02/12)
 
 
 

मुंबई - एकदा मिळालेले नगरसेवकपद पुढील टर्ममध्ये टिकेल की नाही याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही. अगदी दिग्गज नेत्यांचे नातेवाईकही त्याबाबत दावा करू शकत नाहीत, परंतु गेल्या 45 वर्षांपासून मुंबईतील मेहता कुटुंबीयांवर जनतेने विश्वास टाकून त्यांच्याकडे नऊ निवडणुकांमध्ये नगरसेवकपद कायम ठेवले हे वाचून आश्चर्य वाटेल. नुकत्याच पार पाडलेल्या महापालिका  निवडणुकीत नोशीर मेहता या कॉँग्रेस उमेदवाराला नवजीवन कॉलनीतील नागरिकांनी 12,030 मतांनी विजयी करत पुन्हा त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.

नोशीर यांचे वडील रुसी मेहता यांनी 1967 मध्ये सर्वप्रथम या विभागाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी सलग 20 वर्षे या विभागाचे नगरसेवक म्हणून काम पाहिले. लोकांची कामे करण्याची त्यांची हातोटी असल्याने जनता कायम त्यांच्यावर विश्वास टाकत असे. मात्र, 1987 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर कॉँग्रेसने रुसी मेहता यांचे पुत्र नोशीर यांना उमेदवारी दिली. त्यांनी या निवडणुकीमध्ये विक्रमी मते घेऊन विजय मिळवला. त्यानंतर सलग 2002 पर्यंत नोशीर या विभागाचे नगरसेवक होते. मात्र, त्यानंतर हा वॉर्ड महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांची बहीण अनहिता यांना कॉँग्रेसने   उमेदवारी दिली. त्यांनीही सलग दहा वर्षे या विभागाच्या नगरसेविका म्हणून काम पाहिले. यंदाच्या निवडणुकीत नोशीर यांना कॉँग्रेसने पुन्हा संधी दिली व 10 हजारांची आघाडी घेत ते निवडून आले. अनहिता आणि नोशीर हे  वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काम करत असलेल्या एका संस्थेचे काम पाहतात.  अनहिता या भागात गेल्या 10 वर्षांपासून संघटनेच्या माध्यमातून विकासकामे  करत आहेत.

आम्ही चालवू हा पुढे वारसा - अनहिता म्हणाल्या की, माझ्या वडिलांनी चांगले काम केले होते. ते नेहमी येथील रहिवाशांना मदत करून त्यांच्यासाठी उपलब्ध असायचे. त्यांना गरिबीची जाणीव होती. त्यामुळे ते गरिबांना नेहमी मदत करत असे. आम्हीही आमच्या संघटनेद्वारे गरजू मुलांपर्यंत शिक्षण देण्याचे काम करत आहोत.  वडिलांचा हा वारसा आम्ही पुढे सुरू ठेवण्यास कटिबद्ध आहोत. आमचे कुटुंबीय नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिले. नागरिकांना चांगल्या सुविधा देणे हाच आमचा उद्देश आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
4 + 4

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment